Pages

Thursday, November 18, 2010

'आम्ही कोण?' - (अजुन) एक विडंबन

'आम्ही कोण?' - (अजुन) एक विडंबन



केशवसुत आणि आचार्य अत्रे ह्यांची जाहिर क्षमा मागुन, "आम्ही कोण?" ह्या कवितेच्या विडंबनाचे विडंबन.

आम्ही कोण?
'आम्ही कोण?' म्हणुनी काय पुसता माउस टिचकावुनी ?
देखिले जणू नाही अमुचे प्रोफाईल अजुनी तुम्ही ?
लक्षोलक्ष व्हिजीटा झडती ज्या फेसबुकी, दिसले
त्या रद्दी-डेपोत न कसे तुम्हा अमुचे 'बुक' अजुनी?

ते आम्ही - धडाधड टाकू ब्लॉगान्चेही सडे
ते आम्ही - भरवून टाकू पिकासाही तोकडे
ओर्कुट-फोर्कुट कोठेही जा झेंडा अमुचा वसे
कोण्याही मराठ-फोरमी अमुची टिपणी दिसे!

रेषेवर आम्ही जणू, दिसे नभोमंडळी तारका
साईटही अमुची जणू गुगललोकीची द्वारका
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या*
इकडून-तिकडून लिंका ढापू, साईट सजवू पहा

आम्हाला वगळा - गतप्रभ किती होतील गुगल बझे
आम्हाला वगळा - 'ई-सकाळी' कमेंट कैसी पडे?

           - भालचंद्र पुजारी.
-----------------------------------------------------------
(*मूळच्या मूळ कवितेतून ढापिल!)
मूळ कविता 'केशवसुत', मूळ विडंबन 'आ. अत्रे'

ही कविता सर्फिंग करता करता एक ब्लॉग वर वाचली, आणी नेहमीच्या सवयी
प्रमाणे ब्लॉग वर पोस्ट करतोय. पण कविता छान आहे.