Pages

Wednesday, February 23, 2011

डिअर गलर्फ्रेण्डस...डिअर कलिग्ज...डिअर बॉस...

डिअर गलर्फ्रेण्डस...डिअर कलिग्ज...डिअर बॉस...
नुकताच १९ तारखेपासून क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झाला आहे. तमाम भारतीय प्रेक्षकांचं क्रिकेट वेड लक्षात घेता खाली त्यांच्या निकटवर्तीयांसाठी  काही सूचना (धमक्या ? समज आपली आपली..!)....!

कृपया आई, वडील, भाऊ, बहिण, girlfriend (असल्यास, बहुतेक सगळ्यांना असतेच. नसलेल्यांनी काळजी करू नये त्यांच्या मैत्रीणीना आम्ही यात include केल आहे.)  या सगळयांना हि नम्रतेची विनंती आहे कि पुढील सूचना काळजी पूर्वक वाचून पाठ कराव्या व कृपया आमच्या आणि क्रिकेट च्या मध्ये येऊ नये अन्यथा परिणाम काय होतील याची guaranty आम्ही घेणार नाही. 

डिअर गलर्फ्रेण्डस...
१) पुढचा सर्व महिनाभर मी फक्त माझ्या मित्रांशीच जास्तीत जास्त वेळ बोलेन. त्यांच्या घरी मॅच पहायला जाईन किवा त्यांना माझ्या घरी बोलवेन.. त्यामुळे तुला माझ्यासाठी वेळच नाही ही भुणभुण करायची नाही. केल्यास दुर्लक्ष केले जाईल.
२) माझा फोनही याकाळात बिझी असेल तेव्हा फोन घेतला नाही म्हणून सतत करायचा नाही एसएमएस पाठवायचे नाहीत. इग्नोरच केले जातील. फोन बिझी असला तर मी क्रिकेटवर चर्चा करतोय असे वाटून गप्प बसायचे.
३) समजा, एखाद्या दिवशी मी भेटलोच. भेटेनच असे नाही, मॅच बुडवून तुला भेटायला येण्याचे कष्ट मी घेणार नाही. पण तरी आलोच एखाद्या मॅचच्या दिवशी आणि नाही फार बोललो तर त्याचे भलतेसलते अर्थ काढायचे नाहीत. तुझे माझ्यावर प्रेमच नाही, तू दुसरीकडे कुठं अडकलास का, तू का असा वागतोस माझ्याशी, अशी भंकस करायची नाही. मी काहीही ऐकून न घेता निघून जाईन आणि वर्ल्डकप संपेपर्यंत भेटणार नाही.
४)भेटणे-जेवायला जाणे-पार्ट्या-तुझ्या मैत्तिणींचे वाढदिवस असे सगळे कार्यक्रम रहित करण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा आग्रह करण्यात येऊ नये.
५) सगळ्यात महत्वाचं, तुला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही असं सांगण्याची वेळ माझ्यावर आणायची नाही. 'आज कोणाची मॅचे..?' असं लाडात येऊन विचारल्यास आपलं ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. किमान रोजचा पेपर वाचायचा, किमान भारताची मॅच कधी आहे हे पहायचं..आणि प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत.
६) मुलींना फारसं क्रिकेट कळत नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे उगीच आपल्याला फार कळतं अशा अविर्भावात माझ्याशी चर्चा करायला यायचं नाही. चर्चा केली जाईल, पण तेव्हा मी जे काही सांगतोय ते केवळ भक्तीभावानं ऐकून घ्यायचं. क्रिकेटविषयी क्रिकेट सोडून बोलायला तू काही मंदिरा बेदी नाहीस हे लक्षात ठेवायचं.
७) मी मॅच पाहत असताना फोन करुन 'रोमॅण्टिक' गप्पा मारण्याचा प्रयत्नही करायचा नाही. मॅचमधला रोमॅण्टिसिझम मला पुरतो.
८) सचिन तेंडुलकर कितीही आवडत असला तरी ' ए, हा मारेल का आज सेंच्युरी..?' असले बावळट प्रश्न विचारायचे नाहीत..बावळट यासाठी की तेव्हा सचिन नाही तर सेहवाग किंवा युसुफच क्रिझवर असतो..उगीच 'स्मार्ट'नेस दाखवायचा नाही.
९) प्रेमापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं असतं हे तू लक्षात ठेव, त्यामुळे 'तूला माझ्यापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं वाटतं का..?' असा प्रश्न विचारायचा नाही. मी होकारार्थी उत्तर दिल्यास परिणामांना जबाबदार राहणार नाही.
१०) सगळ्यात महत्वाचं..हे सगळे नियम पाळले गेल्यास आणि माझ्या मनाप्रमाणे सगळ्या मॅचेसचे निकाल लागत गेल्यास मी कधीमधी एखादा फोन करीन..तेव्हा तू प्रेमाने आणि ( थोडावेळच)बोलणे बंधनकारक आहे.

डिअर कलिग्ज...
खरं तर सरळ सरळ मित्रांनो (आणि मैत्रिणींनो) असंच म्हणणार होतो, पण माझ्या ऑफिसातले सहकारी तुम्ही..तुम्हाला मित्र म्हणण्याचं धाडस कोण करणार..?
तर माझ्या अतीप्रिय सहकाऱ्यांनो..मी जे बॉसला पत्र पाठवलंय तसंच तुम्हालाही पाठवतो आहे..पण तेवढंच तुमच्यासाठी पुरेसं नाही. आपला बॉस चांगला आहे तसा, त्याला कण्ट्रोल करणं सोपं पण तुम्ही म्हणजे स्वत:ला युसुफ पठाणच समजता..लागता ठोकम्ठोक करायला. बट प्लिज लेट मी टेल यू फ्रँकली..जरा तोंडाला झिप लावा..आणि थोडंसं ऐकून घ्या इतरांचंही. पण तुम्ही माझंच काय पण मी सुद्धा तुमचं ऐकून घेत नाही. वर्ल्डकप तिकडे आणि तिसरं महायुद्ध इकडे असं होऊ नये असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनीच आपल्यासाठी काही 'आचारसंहिता' का तयार करून घेऊ नये..
१) आपण सगळे हे एकमतानं मान्य करून टाकू की आपल्याला सगळ्यांना क्रिकेट खूप कळतं, सचिन तेंडुलकरपेक्षाही जास्त कळतं..त्यामुळे ' तुला काय कळतं, गप्प बस..असं कुणीही कुणाला म्हणणार नाही..'
२) चेंडू 'वाईड' होता की नव्हता, रन आऊट कसा चुकीचा दिला या क्षुल्लक कारणावरून कुणीही चिडणार नाही.
३) 'आज इंडिया हारणारच..' असं जो तावातावाने म्हणेल आणि नाट लावेल त्याचं यावर्षी अॅप्रायझलच काय पण काहीच धड होऊ नये याची काळजी घेण्यात येईल.
४) मॅच पाहणं हा आपल्या सगळ्यांचाच जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो आपण बजावणारच..पण म्हणून 'थोडे'ही काम न करण्याचा त्रास करून घेऊ नये, किमान आपले काम तरी करावेच..
५) झिम्बाम्ब्वे आणि नेदरलॅण्डची मॅच पाहणंही 'मस्ट' असेल तेव्हा ज्या सहकाऱ्यांना क्रिकेट आवडत नाही; त्यांनी कृपया शांत रहावे. मौन व्रत आरोग्यासाठी उत्तम असते..ते पाळले तर बरे..! 

डिअर बॉस...
हे 'वर्ल्डकप'चे दिवस आहेत हे तुम्हाला माहिती असेलच.. (नसेलही कदाचित, तसंही तुम्हाला जगातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात..!)
वर्ल्डकपच्या काळातही मी कम्प्युटरला नाक चिकटवून काम करावं, उत्तम परफॉर्म करावं आणि ऑफिसला वेळेवर यावं असं तुम्हाला वाटत असेल..! असेलच..!
त्या 'वाटण्याला' माझी काहीच ना नाही; पण मी येत्या महिनाभर काम 'करावं' असं वाटत असेल तर कृपया काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात ही विनंती..!

१) मॅच सुरू असताना उगीच खतरुड 'लूक' देऊ नये; तुम्ही तसा 'लूक' दिला आणि तिकडे सचिन आऊट झाला तर मी राजीनामा देण्याचं टोक गाठण्याचीही शक्यता आहे.
२) मॅच सुरू होण्यापुर्वी आणि संपल्यानंतरच काय ती कामं सांगावी, प्लॅनिगच्या मिटिगा कराव्या; त्या मिटिगा लवकर संपवाव्या. अगदी नाईलाज म्हणून मी मॅच सुरू असतानाही मिटिगला येईन पण तेव्हाही स्कोअर काय झाला हे मोबाईलवर पाहीन किवा सहकाऱ्यांना विचारेन. त्या स्कोअरप्रमाणे माझे मूड्स बदलतील तेव्हा प्लिज..
३) मूड्सवरून आठवलं; येत्या महिन्याभराच्या काळात मी 'नॉर्मल' नसेन तेव्हा माझ्याशी बोलताना जरा जपून..! इंडिया जिकत असेल तर मी अती एक्साईट असेन आणि त्या एक्साईण्टपोटी कामच करणार नाही, इंडिया दुर्देवानं हरली एखादी मॅच तर माझं डोकं तडकेल..
४) मॅच ही गप्प बसून पाहण्याची गोष्ट नसते, मी क्रिकेटचा एक्सपर्ट आहे. आपल्या ऑफिसातला हर्ष भोगले आहे असं समजा हवं तर, माझ्यासारखे असे अनेक हर्ष, श्रीकांत, आणि मंदिरा बेदीही आपल्या ऑफिसात आहेत. आम्ही चर्चा करणार, एक्स्पर्ट कमेण्ट देणार, वाद होणार..
५) अॅण्ड लास्ट बट नॉट द लिस्ट...एन्जॉय धिस वर्ल्डकप..पुढच्या वर्षी कदाचित सचिन खेळणार नाही..तेव्हा प्लीज..ट्राय अॅण्ड बी देअर विथ अस..!
     

वरील सर्व सूचना काही दिवस आधीच्या लोकमत पेपर च्या Oxygen या पुरवणीत प्रकाशित झाल्या आहेत. आपणाजवळ अजून काही असतील तर नक्कीच comments मध्ये add करा.