Pages

Monday, August 30, 2010

आणखी काय हवे असते



आणखी काय हवे असते 

एकच चहा तो पण कटिंग........
एकच पिक्चर तो पण टैक्स फ्री.....
एकच साद ती पण मनापासून.......
आणखी काय हवे असते मित्राकडून......?
एकच कटाक्ष तो पण हळूच ...........
एकच होकर तो पण लाजुन.......
एकच स्पर्श तो पण थरथरून ..... 
आणखी काय हवे असते प्रियेकडून......? 
एकच भूताची गोष्ट ती पण रंगवून......
एकच श्रीखंडाची वडी ती पण अर्धी तोडून......
एकच जोरदार धपाटा तो पण शिवी हसडून....
आणखी काय हवे असते आजीकडून....?
एकच मायेची थाप ती पण कुरवलुन... .....
एकच गरम पोळी ती पण तुप लावून........
एकच आशीर्वाद तो पण डोळ्यात आसवे आणून.....
अजुन काय हवे असते आईकडून..........?
एकच कठोर नकार स्वैराचाराला तो पण मनावर दगड ठेवून..... 
एकच सडेतोड उपदेश तो पण घोगारया आवाजातून......
एकच अभिमानाची नजर ती पण आपली प्रगति पाहून....
अजुन काय हवे असते वडिल यांच्याकडून.......?
सगळ्यांनी खुप दिले ते पण न मागुन....
स्वर्गच मला मिळाला तो पण न मरुन....
फाटकी ही झोळी माझी ती पण वाहिली भरून.....
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडून.....?

No comments: