Pages

Saturday, September 25, 2010

असे घडले अयोध्याकांड..................

बाबरी मशीद चा मुद्दा सध्या गरम आहे....
या बाबत महाराष्ट्र टाईम्स मधे छान लेख आलाय...
तो जसाच्या तसा पोस्ट करतोय....


६ डिसेंबर १९९२
राम रस्त्यावर सकाळी ८.३० पासून लागलेल्या रांगा प्रथम आंध्र, नंतर महाराष्ट्र वगैरे वगैरे परिसरात सुमारे दीड-दोन लाख कारसेवक बसलेले. राम कथा कुंजा च्या गच्चीवरून ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना चाललेल्या असतात. शांततेनं कारसेवा करा, अनुशासन पाळा, काही लोकं माथी भडकावतील, पण शांतता राखा...
अशोक सिंघल बोलण्यास उभे राहतात. आम्ही सर्व हिंदू एक आहोत. आमच्यात मतभेद नाहीत. ही पत्रकार मंडळी खोटंनाटट लिहितात. त्यांना योग्य तो जबाब द्या 'या आखात बीबीसीचा उद्धार.

वादग्रस्त २.७७ एकर जागेत, शिलान्यास झालेल्या ठिकाणी झेंडा फडकावलेला असतो. राज्याचे पोलिस चहुबाजुंनी तैनात. त्यांच्यापुढे संघाचे स्वयंसेवक, क्षणाक्षणाला उत्साहाचे उधाण येत असते. 
सियावर रामचंद्र की जय वगैरे. सकाळी ठीक ९.५५ वा. साधू-संतांना राम चबुत-यावर सोडण्यात येते. शंखध्वनी सा-या आसमंतात घुमतो.

याच वेळी सशस्त्र पोलिसांसह जिल्हा दंडाधिकारी श्रीवास्तव पाहणीसाठी चबुत-यावर येतात. रामनामाच्या घोषणा. आजूबाजूया सर्व इमारती-झाडांवर बघे कारसेवक. चबुत-यावर ३००-४०० साधू जमतात.. साधू संत आज चबुतरा धुणार होते. पण त्यासाठी आधी ठरल्याप्रमाणे शरयू नदीतून पाणीही आणलेले दिसत नव्हते. 
'राममंदिर के नींव पर शिलान्यास) मही डालनी है ', असं सांगून आजच्या कारसेवेत सर्वांचं समाधान होईल हे आम्ही पाहू. पण तुम्ही संयम राखा... १०.२० वाजता लालकृष्ण अडवाणी राम चबुत-यावर येतात. बरोबर मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन. कारसेवकांमार्फत प्रचंड स्वागत. दोघं नेते पाहणी करतात. एवढ्यात जोशींना ठेच लागते. अंगठ्याचे नख निघते. तसे ते बाहेर निघतात.

एवढ्यात दक्षिणेच्या दरवाजातून काही कारसेवक कडे तोडून आत घुसतात. आगंतुकपणे. घोषणांचा धुमाकुळ. संघ स्वयंसेवक त्यांना अडवतात. थोडी हाणामारी. थोड्या वेळाने आणखी काही तसेच घुसतात. अडवाणी त्यांनी शांत करण्याऐवजी तसेच निघून जातात. घुसखोरांचा पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्यापुढे नाच सुरू होतो. साधूसंत दोन्हीकडून नाच पाहतात.
राम कथा कुंज च्या गच्चीवरून अडवाणी भाषण करण्यास उभे राहतात. अब दुनिया की कोई ताकद राममंदिर को रोक नही सकती ', अडथळे आणले तर केंद्रात सरकार चालू देणार नाही. '' जो शहीद होने आये है, उन्हे शहीद होने दो. रामचरण मे जाना अगर उनगे भाग मे होगा, तो उन्हे शहीद होने दो '' , भाषा आक्रमक. प्रक्षोभक. त्याच्या प्रत्येक वाक्याला कारसेवकांची दाद.

रा. स्व. संघाच्या आत्मघातकी पथकाने राम चबुत-यावर प्रवेश केलेला असतो. काही घुसखोरांना बाहेर काढले जाते. हाणामा-या नि बाचाबाची काही साधू आया-बहिणीवरून शिव्या घालतात. एक साधू 
व्हॉइस ऑफ अमेरिका च्या वार्ताहराला मारहाण करतात. टाइम मॅगझीनच्या वार्ताहरही यातून सुटत नाही. शिव्यांच्या लाखोलीत पाच-पंचवीस छायाचित्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेतले जातात. काही काँक्रीटवर आदळले जातात, तर काही पळवले जातात. आरडाओरडा, गोंधळ. सिंघल येतात. निघून जातात. या गोंधळात अडवाणी आपले कमांडर शोधू लागतात. मेरे कमांडर किधर है ', अशी चौकशी करतात. प्रचंड हादरलेले असतात. गडबड, गोंधळ सुरूच. प्रभू रामचंद्रांनी संयम पाळला म्हणूनच धनुष्य तोडला. हा ढाचाही तसाच तुटेल. कारण तोपर्यंत साधूसंत शांत होणार नाहीत... माईकवरून कुणाचं तरी भाषण सुरू असतं. गडबड वाढते.

११.५० वा. मशिदीवर पहिला दगड पडतो. पाठोपाठ चहूबाजूंनी दगडाचा वर्षाव. राज्य सरकारच्या सांगण्यावरून मशिदीत केंद्रीय राखीव पोलिसांची तुकडी तैनात असते. या दगडफेकीत हे ७-८ पोलिस घायाळ. तेवढ्यात काही घुसखोर कुंपणावरून मशिदीत घुसतात. घुमटावर चढतात. हजारो कारसेवक उन्मादाने नाचू लागतात. दगडफेकीला आणखीनच जोर चढतो. माईकवरून सूचना सुरू होतत. कोई भी पुलीस हस्तक्षेप करेगा नही. 
'' पुलीस को अनुरोध है के वो किसी भी हालत मे हस्तक्षेप ना करे'' . कारसेवकांवर दगड फेकू नका. कारण आपलेच कारसेवक जखमी होत आहेत.

पोलीस स्वस्थपणे पाहात आहेत. तेवढ्यात आणखी शेकडो कारसेवक कुंपणावरून आत शिरतात. सीआरपीचे डीआयजी ओ. पी. मलिक यांना दगड लागतो. कारसेवक मशिदीत घुसतात. गर्भगृहात जेथे रामाची मूर्ती ठेवली आहे, तेथे विनयकुमार पांडे नावाचा पुजा-याचा मुलगा बसलेला असतो. संतप्त कारसेवक त्याला मारहाण करून मूर्ती बाजूला ठेवतात. मूर्तीचे मुकूट आणि सोन्याचांदीचे दागिने पळवले जातात. घायाळ सीआरपी त्या मुलास घेऊन नियंत्रण कक्षात येतात.

मिळेल त्या हत्याराने, साधनाने घुमटांची खुदाई सुरू होते. शंखध्वनी, टाळ्या, घोषणा आणि तोडफोड. यात बाहेरची भिंत पडते. तसा टाळ्यांचा कडकडाट. मशिदीचा ताबा पूर्णपणे कारसेवक आणि साधूंकडे. सगळे पोलिस एका बाजुला होतात. जिल्हा दंडाधिकारी ज्येष्ठ पोलीस अधिकारी हे दृश्य जवळच्या नियंत्रण कक्षात बसून स्वस्थपणे पाहात असतात. जमावात आता ढोलकी, टाळ, ताशा वगैरे. लोक विजयी मुद्रेने मशिदीच्या विटा, सळ्या वाजतगाजत नेत असतात. एव्हाना १५-२० कारसेवक जखमी. ५० ते ६० पत्रकार-छायचित्रकारांना मारहाण. यातून बीबीसीचे मार्क टुलीही सुटत नाहीत. ६० ते ७० कॅमेरे लंपास. ध्वनिक्षेपकावरून पुन्हा सुटका.
'' सारे रोड ब्लॉक किये जाय. सीआरपी की एकी भी गाडी अंदर आ न सके '' २.४० वाजता घुमटाची एक भिंत कोसळते. २.५० वाजता घुमट जमीनदोस्त. माईकवर आता ऋतंभरा येतात. '' कलंक का ये ढाचा खत्म करो. राम नाम सत्य है. बाबरी मशीद तोड दे '' ऋतंभरा म्हणत, '' एक धक्का और दो '' . कारसेवक म्हणत, '' बाबरी मशीद तोड दो .'' 

४ वाजता आणखी एक घुमट जमीनदोस्त. त्यात अनेक कारसेवक जखमी. त्यांची जागा तिसरी तुकडी घेते. सर्वत्र जल्लोष आणि घोषणा. जिल्हा दंडाधिकारी आणि इतर नुस्ते पाहतात. बरोबर ४.४६ मिनिटांनी मधला घुमट खाली येतो. लाखो कारसेवक आनंदाने नाचत असतात. 
'' कलंक का ढाचा खत्म हुआ '' , राज्याचे पोलीस एकमेकांना टाळ्या देत असतात. साध्वी ऋतंभरा जोराजोरात अभिनंदन करीत असतात. कारसेवकांच्या रांगा रेल्वे स्टेशनकडे. प्रत्येक जण बरोबर जाताना मशिदीच्या दगड-विटांसह दिसतो. वार्ताहर-छायाचित्रकार पोलिसांच्या ट्रकमधून कसेबसे फैजाबादेत. तेथे कर्फ्यू. तेथले लोक म्हणतात- आखिर बीजेपीने ढाचा खत्म तो किया. सर्वत्र बीजेपीचे कौतुक. कर्फ्यूतही रस्त्यावर वर्दळ. चर्चा. एव्हाना अडवाणी-जोशी कधीच गायब झालेले असतात.





७ डिसेंबर १९९२
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अनेक शहरांत संचारबदी. फैजाबादेत सहा डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी जाळपोळ. रस्त्यावर शुकशुकाट. कारसेवक जथ्थ्या जथ्थ्याने निघालेले. परतीच्या वाटेत घोषणा ऐकायला मिळत नाहीत. जो तो शांतपणे निघालेला. संचारबंदी असली तरी फारशी कठोर नाही. त्यामुळे घराच्या दाराबाहेर पेपर वाचत चर्चा चाललेली मिळते.


कल्याणसिंगने सही वक्त पर इस्तिफा दे दिया. अब तो नरसिंहा राव को भी जाना पडेगा. अच्छा हुवा बरसोंका कलंक मिट गया. बीच्जेपी तो अब सेंटरमे जायेगा. कोई उसे रोक नही पायेगा... एकंदर लोक भाजपवर एकदम खूष. व्ही. पी. सिंग आणि नरसिंह राव या दोघांनाही शिव्याशाप. राज्याचे पोलिसही वर्तमानपत्र वाताना चर्चा करताना दिसतात. सूर एकच. बीजेपीने बडा अच्छा काम किया. सर्वत्र टीका होत असताना जनमत भाजपबरोबर.

अयोध्येच्या वाटेवर जाताना फैजाबादेत झालेली जाळपोळ दिसते. फैजाबादची हद्द संपातच अयोध्येची हद्द सुरू होते. कारसेवक मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकाकडे निघालेले असतात. प्रत्येकाच्या हातात कारसेवेची खूणगाठ म्हणून वीट, सळई इत्यादी वस्तू. बाबरी मशीद पाडल्यानंतर मिळलेल्या चीजा. मधूनमधून सीयारामच्या घोषणा.

अयोध्येत शिरताच ठिकठिकाणी धुराचे लोट आकाशाकडे झेपावताना दिसतात. घरांना, दुकानांना आगी लावण्याचा कार्यक्रम जोरात सुरू असतो. हा कार्यक्रम रात्रीपासून असल्याने एव्हाना ६०-७० घरे भस्मसात झालेली असतात. कारसेवक उत्साहाने उरलेली कारसेवा करताना दिसत असतात. स्थानिक लोक घरं दाखवतात आणि कारसेवक आगी लावतात, असे चित्र. स्थानिक पोलीस कोंडाळी करून प्रत्येक घटना कुतुहलाने पाहताना दिसतात. घर अथवा दुकान फुटले की लोक आत घुसून लूटमार करतात. यात स्थानिक पोलिसही हाताला लागेल ते घेऊन बाजूला होतात. कारसेवक चुकून एका हिंदूच्या बंद घरावर हल्ला करतात. लोक सांगतात, 'इधर नहीं भाइं उधर'. मोर्चा तिकडे वळतो. असे प्रकार अयोध्येत ठिकठिकाणी चालू असतात.

स्थानिक अधिका-यांना विचारलं असता ते म्हणतात, हम क्या करें, हमें काई आदेश नहीं. डीएम फैजाबाद जा बैठे है. बाबरी मशिदीजवळ जोरात कारसेवा चाललेली असते. एव्हाना मशीद पूर्णपणे साफ झालेली असते. बायका पुरुष उत्साहाने माती, दगड, वीटा दूरवर टाकताना दिसतात. विश्व हिंदू परिषदेच्या र्माकवरून सूचना चालेल्या असतात. ज्यांना काल कारसेवेत भाग घेता आला नाही, त्यंनी आज कारसेवा करुनच निघावे. पविग कार्यात मागे राहू नका. इ. इ.

इतक्यात आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागेत. उद्ध्वस्त बाबरी मशिदीजवळ पाच-पन्नास हजारांचा जमाव 'जय सीयाराम'च्या घोषणा देतो. हेलिकॉप्टर बीएसएफ अथवा लष्कराचे असावे. अयोध्येची हवाई पाहणी चालू असते. बाबरी मशीद चली गयी, अब नरसिंह राव चला जायेगा,' जोरदार घोषणा. उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी अयोध्येत कारसेवकांचेच राज्य सुरू असते.

मशिदीची जागा साफ करुन तिथे रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम चालू असतो. तात्पुरती जागा सारवून त्यावर मूर्ती ठेवल्या जात असतात. राम मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याशिवाय डीएम म्हणजे जिल्हा दंडाधिकारी सीआरपींना बोलावणार नाहीत, अशी जोरदार चर्चा. तिकडे रामकथा कुंजच्या गच्चीवरुन भाषणं चालू असतात. हजारोंच्या संख्येने कारसेवक ती भाषणं ऐकत असतात. अब महाराष्ट्र के भूतपूर्व विरोधी पक्ष नेता मनोहर जोशी साहब भाषण करेंगे... जोशी मोठ्या जोशात बोलत असतात. सहा डिसेंबर हा हिंदूच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन म्हणून नोंद होईल. इ. इ.

फैजाबादकडे जाणा-या रस्त्यावर ठिकठिकाणी वखारी पेटलेल्या असतात. उरल्यासुरल्या मशिदी फोडण्याचे काम सुरू असते. धुराचे लोळ आकाशाकडे झेपावत असतात. विहिंपच्या नेत्यांच्या मोटारीचा ताफा निघालेला असतो... पुढे एस्कॉर्ट मागे एस्कॅर्ट... आचार्य गिरीराज किशोर एका मोटारीतून आग पहात जात असतात... जय सीयारामच्या घोषणेने त्यांना निरोप देण्यात येत असतो.

थोड्या वेळाने शिवसेना नेत्यांच्या मोटारी निघतात. मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ता नलावडे, लीलाधर डाके, आनंद दिघे फैजाबादकडे मार्गस्थ होतात... जाळपोळ आणि लुटालूट चालूच असते... पोलीस मजा पाहत असतात आणि हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत असते... अजूनही केंद्र सरकार आकाशातच असते.



८ डिसेंबर १९९२ 
अयोध्येत ८ डिसेंबरला पहाटे साडेतीन-चारचा सुमार. बाबरी मशिदीच्या जागेवर चोहोबाजूने पाच फुटी भिंत. आत चौथरा, चौथ-यावर राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती विराजामान झालेल्या असतात. पाच पन्नास उत्साही कारसेवक परिसरात गप्पा मारत बसलेले असतात काळोख आणि थंडी. केंदीय राखीव पोलिसांचा रॅपिड अॅक्शन फोर्स काळोखात सावधपणे निघालेला. बाबरी मशीद एका टेकाडावर होती. मागच्या बाजूला मोठा खोलवर भाग.

अयोध्येतील वादग्रस्त जागेचा ताबा घेण्याचा आदेश जारी झालेला असतो. चोहोबाजूने जवान सावकाशपणे अंदाज घेत पुढे निघालेले असतात. हळूहळू टेकाड चढून एक-एक जण वर येतो. ज्या जागेवर मूर्ती ठेवल्या आहेत. तिला वेढा पडतो. इतक्यात कारसेवकांना खबर लागते. शंभर-दोनशे तरुण सामोरे जातात. आरडाओरडा आणि गलका. सगळे खडबडून जागे होतात.

जवान काठ्या-लाठ्या आपटत चालून जातात. त्यामुळे एकच घबराट. जे कारसेवक सामना करायला जातात त्यांच्यावर सौम्यपणे छडीमार. जो तो धावत सुटतो. एव्हाना सगळे जागे होऊन परिसराकडे निगालेले असतात. 'राम कथा कुंज'चा माइक सुरू होतो. 'अयोध्यावासी चले आव सीआरपीने हमला बोल किया हे' रामद्रोही आये हे... अयोध्यावासी चले आव...'

हनुमानगढी आणि मानसभवनमधून दगडफेक सुरू होते. रॅपिड अॅक्शन फोर्सची त्वरेने कारवाई... अश्रुधूराची पाच नळकांडी फुटतात. दुस-या बाजूने थंडगार पाण्याचा मारा. जो तो मिळेल त्या वाटेने. जीवन मुठीत घेऊन... कोण म्हणते फैरिंग हो रही है... मग आणखीनच धावाधाव... अवघ्या पंधरा मिनिटात सगळा परिसर रिकामा.

रॅपिड अॅक्शन फोर्सची कारवाई फत्ते झालेली असते. सगळा विवाद्य परिसर ते ताब्यात घेतता. कारसेवक फैजाबादच्या रस्त्यावर जमलेले असतात. तिथेही चोहोबाजूने केंद्रीय राखीव पोलिस... कारसेवा रोखी गयी है. आप अपने अपने सीआरपीच्या गराड्यात राममूर्ती सुरक्षित. पूजेसाठी फक्त पुजा-याच्या अपवाद.

अयोध्या रेल्वे स्थानकावर परतण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या लागल्या असतात. काल रात्रीपासून १८ गाड्या भरभरून कारसेवक गेले. थांबण्याचा आदेश असतानाही. रात्रीच पंतप्रधान नरसिंह राव यांचा निरोप आला होता, असे विहिंपवाले सांगतात. शांतपणे परिसर मोकळा करा, केन्दीय राखीव पोलिस मारहाण करणार नाही. झाले तसेच किरकोळ दगडफेक आणि परचुटन लाठीमार. मामला संपला.

सकाळपर्यंत राखीव पोलिसांनी संबंध अयोध्येत झडत्या घेतल्या. जे बाहेरगावचे होते त्या सर्वांना बाहेर काढून वाटेला लावले. नऊ वाजेपर्यंत सगळ्या अयोध्येवर नियंत्रण. दुपारी १२ वाजेपर्यंत संबंध वादग्रस्त विभागाभोवती तारेचं जबर कुंपण उभारले होते. कुंपणाबरोबरच जागोजाग सशस्त्र जवान.

उत्तर प्रदेशचे पोलिस कारसेवकांबरोबच दूर लोटलेले असतात. अयोध्येतील कारसेवकांच्या सर्व राहुट्या रिकाम्या झालेल्या असतात. दुपारी बाराच्या सुमारास महाराष्ट्रातील व खासकरून मुंबईचा जथ्या निघालेला असतो... हा जथ्या शेवटाच असल्यामुळे अयोध्येत आता एकही कारसेवक उरलेला नसतो. सरचिटणीस अशोक सिंघल सकाळी पाऊणे दहाच्या सुमारास अयोध्या सोडून गेलेले असतात...

गेले पंधरा दिवस गजबजलेली अयोध्या जवळजवळ निर्जीव. आठ दिवसरात्र चाललेले भटारखाने थंड झालेले. भटारखान्याबाहेर कांदे-बटाटे आणि वाग्यांचे ढीग तसेच पडलेले... गेले पंधरा दिवस अहोरात्र घसा कोरडा करणारा विहिंपचा ध्वनिक्षेकही आता शांत झालेला असतो... त्यामुळे एकदम शांतता. अयोध्येत आता फक्त सीआरपी आणि रॅपिट अॅक्शन फोर्सच्या मोटारींचा आवाज आणि जागोजाग कारसेवकांनी केलल्या जाळपोळीच्या खुणा व उद्ध्वस्त झालेली मुसलमानांची घरे. बाकी सर्व संपले. तूर्तास!



ही आहे कहाणी अयोध्याची ............
लेख प्रताप आसबे यांनी लिहिले असून मी फ़क्त माज्या ब्लॉग वर पोस्ट करतोय............

Friday, September 24, 2010

कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे


कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे
दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज canteenच्या कटींगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे
कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
A\C Coneference roomsमध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी, कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODCमध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे
सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो-तो projectमध्ये बिझी ज़ालाय
भुला भटका missed call आता महाग झालाय
forwards आणि chain mailsमध्ये खुषालीची मैल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे
दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलेब्रेशन्स,पार्टीज साठी pizza hutchaचा रस्ता गाठतो
vegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो
पण pocket moneyसाठवून केलेल्या partyची मजा ह्यात शोधत आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे
रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे
खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
officeमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक प्रोफेशनल आहे
ही कविता तर माझी नाही आहे, पण बऱ्याच वेळी अस होत की नेमकी एखादी गोष्ट 
आपल्या मनातल्या भावना व्यक्त करुन जाते. 
बहुदा ही कविता प्रत्येकाच्या मनातील बोलाच बोलते. ...
खरच आयुष्य एक टॅग ने बांधून ठेवलय.....................

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं



   लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं


    लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
    सरळ जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं
    गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
    घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं 

    लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
    ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं
    सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
    आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
    पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!

    लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं
    वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं
    शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं
    नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं
    होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!

    लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
    ५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं
    ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं
    सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं
    हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

    लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
    लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
    अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
    तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं
    दोघांपुरतंच बांधलेलं ७० एम एम थिएटर असतं!!

    लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे पहिला सिप असतं
    चवीसाठी आतुरलेला टीनेजरचा लिप असतं
    फ़ेसाळलेल्या नशिबासाठी हवाहवासा ग्लास असतं
    आऊट होतील त्यांच्यासाठी दुसया दिवशी त्रास असतं
    झेपेल त्यानीच घ्यावी असं "विदाउट पाणी क्वार्टर" असतं!!
                                                           - संदीप खरे.

खरच खुप छान कविता आहे ही.............

Tuesday, September 21, 2010

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही......

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा chat रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय?
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे……… कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,

म्हणुन……………….
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही......

ही कविता माझी नाही. मला कोणीतरी मेल ने पाठवली होती. 
पण दुर्दैवाने ही कविता आजच्या जीवनच सत्य सांगते..........

खरच सगळे मित्र इतके दूर गेले का ?...................

Saturday, September 4, 2010

कॉलेजलाईफ आणि भाड्याच्या रूम

कॉलेजलाईफ आणि भाड्याच्या रूम

कॉलेजलाईफच्या धसमुसळ्या वयात बारा महिन्यांत बारा घरे बदलून झाली असतील. बारा घरची बाराप्रकारची मालक मंडळी तेव्हा भेटली. ते भाड्याचं घर असल्याने कधीही खाली करावं लागेल, अशा धारधार तलवारीची नेहमीच डोक्यावर दहीहंडी असायची. ऍडव्हान्स भाडं दिलं की रूम आपली, म्हणायला आपली. आमच्या रूमवर आमच्यापेक्षा मालकाचाच बारीक डोळा असायचा.
पंखा कमी स्पीडवर ठेवत जा, रात्री दहानंतर लाईट वापरू नका, झोपतांना सगळे दिवे बंद करा, पाण्याचा नळ चालूच ठेऊ नका, भिंतींना नवे खिळे ठोकलेले चालणार नाहीत, रुम आठवड्यातून एकदा पुसावीच लागेल, टॉयलेटला हप्त्यातून एकदा ब्रश मारावाच लागेल, खिडक्यांना दोरे बांधून कपडे वाळत घालता येणार नाहीत, रुमवर ऐऱ्‍यागैऱ्‍या मित्रांना आणायचं नाही, रात्र रात्र जागून गप्पा हाणायच्या नाहीत, दिवसादेखील जोरजोरात हसत खिदळत बसायचं नाही, अपेयपान केल्याचे निदर्शनास येताच त्याचक्षणी सामान बाहेर फेकून दिले जाईल... अशा अनेक अटी व नियम सांगणारे मालकलोक आम्हांला भेटले. त्यांच्या त्या कंडिशन्स आम्ही बाडबिस्ताऱ्‍यात गुंडाळून ठेवत कित्येक रुमा बदलल्या !
नवीन रुम घेतली की आमचा संसार सुरु... इन मिन वस्तू तीन. कपड्या-पुस्तकांची सूटकेस, एक बादली अन् अंथराय-पांघरायची वळकटी. बस्स. सगळाच सुटसुटीत मामला ! एकाच खेपेत आपलं बिऱ्‍हाड पाठीवर लादून आम्ही रातोरात अनेक रुमा बदलल्या आहेत...
पहिले काही दिवस नव्या मालकमजकुराच्या अटींच्या फैरी झेलाव्या लागत. त्यांच्या शोधक नजरांच्या हेरगिरीचे बाण घायाळ करीत. 'हे करू नका, ते करू नका, अमूक चालणार नाही, तमूक चालणार नाही' अशा नन्नाच्या पाढ्याखाली दबून राहावं लागे. एकदा का भीड चेपली की आम्हां भाडेकरुंना मालकाच्या नियमावलीची चीड आलीच म्हणून समजा! ते नियम कशाप्रकारे तोडता येतील? यावरच आमची गुप्त खलबते चालत. मालक विरुद्ध भाडेकरू असा तो सूप्त संघर्ष उडे. आपण फुकट राहतो की काय इथे? हे आमचं तत्वज्ञान आम्हांला स्वस्थ बसू देईल तर शपथ ! त्यामुळे महिनाभराचं आधीच दिलेलं भाडं पूर्णपणे वसूल करण्यासाठी आमची धडपड चालायची. म्हणूनच की काय आमचं कोणत्याच मालकमहाशयाबरोबर सूत जुळलं नाही...
तशी आम्ही संडी पोरं. रोज अंडी खाणारी, कॉलेजला कधीमधी दांडी मारणारी. त्या सुट्टीच्या दिवशी दिवसभर रुमवर लोळत पडायचं अन् रात्रभर रुमच्या पुढील चौकात ढांगटींग करीत जागायचं. हे आमचं रुटीन. मग दुसऱ्‍या दिवशी नळाचं पाणी गेल्यावरच जाग यायची. तेव्हा रिकामी बादली हलवित, ब्रश अन् पेस्टचा फेस दोन्हीही सांभाळून 'बादलीभर पाणी देता काहो काका,' अशी निर्लज्ज भीक मालकमहोदयाकडे मागावी लागे. ते 'बेणं' शानं असेल तर मुकाट्याने 'पिँपातून पाणी काढून घे' म्हणायचं अन् येडं असेल तर आमच्या नाकावर धाडकन दार आपटून आतमध्ये नाष्टा झोडीत बसायचं. त्या दिवशी पारोशा अंगाने प्रत्येक क्लासमेटला, आज मी कशी बिनपाण्याची अंघोळ केली हे सांगून गंडवतांना मोठी मौज वाटायची !
एक तारीख जवळ आली की आमची खिसे चाचपणी सुरु व्हायची. कारण महिन्याच्या पहिल्याच दिवशी मालक रुमपुढे हजर. जोरात 'अलख निरंजन' करणार. त्यांचं दान त्यांच्या हातात पडलं नाही तर रामप्रहरी जुंपायची. हे टाळण्यासाठी म्हणून मग आदल्या दिवसापर्यँत काँट्री करुन भाड्याचा आकडा कसाबसा गाठला की हुश्शऽ करायचं. कारण मन्थएण्डला बहुतेकांचे खिसे उताणे पडलेले असायचे. भाड्याची रक्कम गोळा व्हावी याकरिता 'एक कट दोन हाफ' किँवा 'वन बाय टू' अशी चहाची तडजोड करण्यातही वेगळ्याच शेअरिंगचा अनुभव मिळायचा...
काही मालक मात्र फार कनवाळू अन् भल्या मनाचे भेटले. आम्ही कितीही दंगामस्ती केली तरी ते निमूटपणे ऐकत बसायचे. एकदा आम्ही रात्रभर गोंधळ घातला. तरीही ते डाराडूर झोपलेले! आम्हांला वाटलं म्हातारा म्हातारी झोपेच्या गोळ्या खाऊन कायमचे निजले की काय? परंतु छट्! त्यांचे डोळे जरी गच्च बंद होते तरी कान टक्क उघडे असल्याचं सकाळच्या त्यांच्या टीपण्णीवरुन लक्षात आलं आणि आम्ही रात्रीच्या गप्पा आठवून नको इतके ओशाळलो! त्यांचीही वेगळीच करुण कहाणी होती. त्यांना अपत्यच नव्हतं म्हणून ते आमचा धिंगाणा एँजॉय करायचे. हे कळल्यावर आम्हांला गलबलल्यासारखं झालं. आम्ही शहाण्या पोरांसारखे वागू लागलो. शांत शांत राहू लागलो. एकदा त्यांनी विचारलं, 'रुममध्ये कुणी नसतं का हल्ली? नाही, म्हटलं पूर्वीसारखा गोंगाट नसतो आता म्हणून विचारलं.'