Pages

Tuesday, December 28, 2010

क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणांचा। मग पुढें॥...........

प्रेम आणि मरण - गोविंदाग्रज

कुठल्याशा जागी देख।
मैदान मोकळे एक॥ पसरले॥
वृक्ष थोर एकच त्यात।
वाढला पुर्या जोमात॥सारखा॥
चहुकडेच त्याच्या भंवते।
गुडघाभर सारे जग तें॥तेथले॥
झुडुपेंच खुरट इवलालीं।
मातीत पसरल्या वेली॥माजती॥
रोज ती। कैक उपजती। आणखी मरती।
नाहिं त्या गणती। दादही अशांची नव्हती॥त्याप्रती॥

त्यासाठी मैदानात।
किती वेली तळमळतात॥ सारख्या॥
परि कर्माचें विंदान।
काहीं तरि असतें आन॥ चहुंकडे॥
कोणत्या मुहूर्तावरती।
मेघात वीज लखलखती। नाचली॥
त्या क्षणी। त्याचिया मनीं। तरंगति झणीं।
गोड तरि जहरी। प्रीतीच्या नवथर लहरी॥ न कळता॥

तो ठसा मनावर ठसला।
तो घाव जिव्हारीं बसला॥ प्रीतिचा॥
वेड पुरें लावी त्याला।
गगनातिल चंचल बाला। त्यावरी॥
जातिधर्म त्याचा सुटला।
संबंध जगशीं तुटला॥ त्यापुढें।
आशाहि। कोणती कांही। रहिली नाही।
सारखा जाळी। ध्यास त्यास तीन्ही काळी॥ एक तो॥

मुसळधार पाउस पडला।
तरि कधीं टवटवी त्याला॥ येइना॥
जरि वारा करि थैमान।
तरि हले न याचें पान॥ एकही॥
कैकदा कळ्याही आल्या।
नच फुलल्या कांही केल्या॥ परि कधीं॥
तो योग। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।
लागला ज्याला। - लागतें जगावें त्याला॥ हें असें!॥

ही त्याची स्थिति पाहुनिया।
ती दीड वीतिची दुनिया॥ बडबडे॥
कुणी हंसे कुणी करि कींव।
तडफडे कुणाचा जीव॥ त्यास्तव॥
कुणि दयाहि त्यावरि करिती।
स्वर्गस्थ देव मनिं हंसती॥ त्याप्रती॥
निंदिती। कुणी त्याप्रती। नजर चुकविती।
भीतिही कोणी। जड जगास अवघड गोणी॥ होइ तो॥

इष्काचा जहरी प्याला।
नशिबाच्या ज्याच्या आला॥ हा असा॥
टोंकाविण चालू मरणें।
ते त्याचे होतें जगणें॥ सारखें॥
ह्रदयाला फसवुनि हंसणें।
जीवाला न कळत जगणें॥ वरिवरी॥
पटत ना। जगीं जगपणा। त्याचिया मना॥
भाव त्या टाकी। देवांतुनि दगडचि बाकी॥ राहतो॥


यापरी तपश्चर्या ती।
कीती झाली न तिला गणती राहिली॥
इंद्राच्या इन्द्रपदाला।
थरकांप सारखा सुटला॥ भीतिने॥
आश्चर्ये ऋषिगण दाटे।
ध्रुवबाळा मत्सर वाटे॥ पाहुनी॥
तों स्वतां। तपोदेवता। काल संपतां।
प्रकटली अंती। "वरं ब्रूहि" झाली वदती॥ त्याप्रती॥

"तप फळास आलें पाही।
माग जें मनोगत कांही॥ यावरी॥
हो चिरंजीव लवलाही।
कल्पवृक्ष दुसरा होई॥ नंदनीं॥
प्रळयींच्या वटवृक्षाचें।
तुज मिळेल पद भाग्याचें। तरुवरा॥"
तो वदे। "देवि सर्व-दे,। हेंच एक दे-।
भेटवी मजला। जीविंच्या जिवाची बाला॥ एकदा॥"
सांगती हिताच्या गोष्टी।
देवांच्या तेतिस कोटी॥ मग तया॥
"ही भलती आशा बा रे॥
सोडि तूं वेड हें सारें॥ घातकी॥
स्पर्शासह मरणहि आणी।
ती तुझ्या जिवाची राणी॥ त्या क्षणीं॥
ही अशी शुध्द राक्षसी। काय मागसी।
माग तूं कांहीं। लाभले कुणाला नाही॥ जें कधीं॥"

तो हंसे जरा उपहासें।
मग सवेंच वदला त्रासें॥ त्याप्रती॥
"निष्प्रेम चिरंजीवन तें।
जगिं दगडालाही मिळतें॥ धिक तया॥
क्षण एक पुरे प्रेमाचा।
वर्षाव पडो मरणांचा। मग पुढें॥"
निग्रहें। वदुनि शब्द हे। अधिक आग्रहें!
जीव आवरुनी। ध्यानस्थ बैसला फिरुनी॥ वृक्ष तो॥

तो निग्रह पाहुनि त्याचा॥
निरुपाय सर्व देवांचा॥ जाहला॥
मग त्याला भेटायाला।
गगनांतिल चंचल बाला॥ धाडिली॥
धांवली उताविळ होत।
प्रीतीची जळती ज्योत॥ त्याकडे॥
कडकडे। त्यावरी पडे। स्पर्श जों घडे।
वृक्ष उन्मळला। दुभंगून खालीं पडला॥ त्या क्षणीं॥
दुभंगून खालीं पडला।
परि पडतां पडतां हंसला॥ एकदा॥
हर्षाच्या येउन लहरी।
फडफडुनी पानें सारीं॥ हांसलीं॥
त्या कळ्या सर्वही फुलल्या॥
खुलल्या त्या कायम खुलल्या॥ अजुनिही॥

तो योग्। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।
लागला ज्याला। लाभतें मरणही त्याला॥ हें असें॥
गोविंदाग्रज

गोविन्दग्रजांची ही कविता नेहमीच मला भुरळ घालते. उत्कट प्रेमाच हे खुपच छान उदहारण आहे. 

Monday, December 20, 2010

तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर्स?

तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर्स?

तुम्ही वेबसाईट किंवा ब्लॉग चालवता? मग तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर्स आहे हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

किती असेल तुमच्या वेबसाईटची किंमत? शून्य डॉलर, एक डॉलर, पाच डॉलर, दहा डॉलर, शंभर डॉलर की त्याहून अधिक?


तुमच्या वेबसाईटची किंमत जाणून घ्यायला आता तुम्ही उत्सुक झाला आहात ना? चला तर मग मी ही तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही.

http://www.yourwebsitevalue.com या वेबसाईटवर जा. तेथील  अ‍ॅड्रेस बॉक्समध्ये तुमच्या साईटची URL टाईप करा आणि Estimate Website Value या बटनावर क्लिक करा. दहा टप्प्यात तुमच्या साईटचे परीक्षण काही क्षणातच केले जाईल आणि पुढील काही क्षणातच तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर आहे ते डिटेल्ससह तुम्हाला या वेबसाईट वर झळकलेले दिसेल.

त्याचसोबत गुगल, फेसबुक, युट्युब, याहू यासारख्या टॉपटेन वेबसाईटच्या किंमतीची यादीही येथे पाहायला मिळेल. इतकेच नव्हे तर तुमची वेबसाईट जर तुम्हाला विकायची असेल तर त्यासाठीची नोंदणीही करण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे.

Original Post - http://nathtel.blogspot.com/2010/12/blog-post_15.html

Monday, December 6, 2010

"पीएम" ची लक्षणे

"पीएम" ची लक्षणे

सॉफ्टवेयर मधे काम करत असलेल्याना पीएम कसा असतो हे वेगले सांगायची गरज नाही आहे.
रामदासांनी सांगितलेल्या मुर्खांच्या लक्षणांशी या लिखाणाशी कोणताही संबंध नाही, तसे काही जाणवल्यास तो केवळ योगायोग समजावा, सुज्ञास जास्त सांगणे नलगे !
कळावे...आपल्या सारखाच एक "पिडित"

जयाला प्रत्येक गोष्टीची घाई
रोजच्या कामाचे स्टेटस पाही
विचारुन करी जो हैराण मानव.......................॥१॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

जो दर दिवशी मिटिंग घेई
तरी त्यास कसले समाधान नाही
फुका जयाला कामाची घाई............................॥२॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................ ॥ध्रु॥

जो बोलू लागता झोप येई
काही विचारता गाठे जांभई
जयाला पाहता मागे जातसे बाही.....................॥३॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

डोक्यावरी बैसोनी
कामाची घाई करोनी
नंतर चेंजेस सांगे फिरुनं
तरी जो न देई जास्तीचा वेळं
वाटे तयाला सगळाच खेळं.............................॥४॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥


जो कधीही न पडे आजारी
कामाचे तया असे वेड भारी
तयाचि (ची) इच्छा काम करावे शनिवारी.........॥५॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

मुक्त पाखरावर ठेओनि (ठेवोनी) लक्षं
अलोकेशनाने (अॅलोकेशन) करी तयाचे तो भक्षं
रहावे सदा तयासमोर दक्ष.............................॥६॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

सगळे काम संपता
जो होई कावरा बावारा
डीलीव्हरीच्या दिवशी
तयाचा होई
"बैजु बावरा"...............................................॥७॥
अशा पामराला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................ ॥ध्रु॥

समोर पी॓एम येता
आपल्याकडे पाहुनि (नी) हसता
सत्वर दक्ष व्हावे
देवास पुजावे मनोभावे...................................॥८॥
भेसुर हसणे हे सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

हसणे तयाचे असते ग्वाही
संकटे घेरणार दिशांनी दाही
देवाचि (ची) करुणा भाकावी
तयास नवसाची लालुच (लालूच) दाखवावी,.........॥९॥
अशा संकटाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

सर्वांसमोर जो करी कौतुकं
जणु ते शाब्दिक माणिक मौतिकं
सोनेरी दागिन्यांचे सत्वर
पडतसे उघडे पितळ......................................॥१०॥
अशा दागिन्यांना सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

ता.क. - ही कविता माझी नाही.