Pages

Monday, December 6, 2010

"पीएम" ची लक्षणे

"पीएम" ची लक्षणे

सॉफ्टवेयर मधे काम करत असलेल्याना पीएम कसा असतो हे वेगले सांगायची गरज नाही आहे.
रामदासांनी सांगितलेल्या मुर्खांच्या लक्षणांशी या लिखाणाशी कोणताही संबंध नाही, तसे काही जाणवल्यास तो केवळ योगायोग समजावा, सुज्ञास जास्त सांगणे नलगे !
कळावे...आपल्या सारखाच एक "पिडित"

जयाला प्रत्येक गोष्टीची घाई
रोजच्या कामाचे स्टेटस पाही
विचारुन करी जो हैराण मानव.......................॥१॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

जो दर दिवशी मिटिंग घेई
तरी त्यास कसले समाधान नाही
फुका जयाला कामाची घाई............................॥२॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................ ॥ध्रु॥

जो बोलू लागता झोप येई
काही विचारता गाठे जांभई
जयाला पाहता मागे जातसे बाही.....................॥३॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

डोक्यावरी बैसोनी
कामाची घाई करोनी
नंतर चेंजेस सांगे फिरुनं
तरी जो न देई जास्तीचा वेळं
वाटे तयाला सगळाच खेळं.............................॥४॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

जो कधीही न पडे आजारी
कामाचे तया असे वेड भारी
तयाचि (ची) इच्छा काम करावे शनिवारी.........॥५॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

मुक्त पाखरावर ठेओनि (ठेवोनी) लक्षं
अलोकेशनाने (अॅलोकेशन) करी तयाचे तो भक्षं
रहावे सदा तयासमोर दक्ष.............................॥६॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

सगळे काम संपता
जो होई कावरा बावारा
डीलीव्हरीच्या दिवशी
तयाचा होई
"बैजु बावरा"...............................................॥७॥
अशा पामराला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................ ॥ध्रु॥

समोर पी॓एम येता
आपल्याकडे पाहुनि (नी) हसता
सत्वर दक्ष व्हावे
देवास पुजावे मनोभावे...................................॥८॥
भेसुर हसणे हे सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

हसणे तयाचे असते ग्वाही
संकटे घेरणार दिशांनी दाही
देवाचि (ची) करुणा भाकावी
तयास नवसाची लालुच (लालूच) दाखवावी,.........॥९॥
अशा संकटाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

सर्वांसमोर जो करी कौतुकं
जणु ते शाब्दिक माणिक मौतिकं
सोनेरी दागिन्यांचे सत्वर
पडतसे उघडे पितळ......................................॥१०॥
अशा दागिन्यांना सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

ता.क. - ही कविता माझी नाही.

No comments: