Pages

Showing posts with label zenda movie song. Show all posts
Showing posts with label zenda movie song. Show all posts

Monday, May 3, 2010

विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती......!

विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती

जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…
साचले मोहाचे धुके घनदाट हो …||२||
आपली माणसं आपलीच नाती
 तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ||३||

आजवर ज्यांची वाहिली पालखी
 भलताच त्याचा देव होता…||२||
पुरे झाली आता उगा माथेफोडी
दगडात माझा जीव होता …||२||
उजळावा दिवा म्हणूनिया किती
 मुक्या बिचार्‍या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती ||3||

बूजगावण्यागत व्यर्थ हे जगणं
उभ्या उभ्या संपून जाई…||2||
अळ रीत रीत माझं बघुनी उमगलं
कुंपण इथ शेत खायी…||2||
भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती
तरी झेंडे एगळे, वेगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती ||3||


This is one of my favorite songs telling the truth of the politics from the famous movie "Zenda"



या गाण्याबद्दल लिहीण थोड कठीण आहे. कारण हे गाणं स्वतःच खूप काही सांगून जातं. बऱ्याचदा अस होत कि १०० ओळींचा एक उतारा जेवढा काही सांगेल त्याहून खूप काही १ गाणे छोट्या शब्दात सांगत.

वस्तुतः हे गाणं आपल्या प्रत्येकाला लागू पडतं. या गाण्याची पार्श्वभूमी जरी राजकारणाची असली, तरीही जीवनातल्या अनेक गोष्टीवरती हे गाणे जसे च्या तसे लागू पडते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या मनातली घालमेल या गाण्याने अतिशय कमी पण मोजक्या शब्दात मांडलेली आहे. आणि ती जशीच्या तशी लागू पडते.


खरचं आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात तेव्हा आपल्याला माहिती पडतं कि खरच आपण ज्याच्यावर इतका जीव ओवाळून टाकला तो खरच आपल्यावर तितकाच प्रेम करतो, तो हि आपल्याला तितकाच आपलं मानतो ? कि तो फक्त आपल्याला १ शिडी समजतो, वर जाण्याची त्याचा स्वार्थ सध्या करण्याची.

आणि हि वस्तुस्थिती जेव्हा माहिती होते ना, खरच मनाची घालमेल कशी थांबवावी हेच कळत नाही. काय करावं काय करू नये काहीहि समजत नाही आणि शेवटी झेंडा चित्रपटातल्या उमेश ने केला तेच कराव लागतं.