Pages

Tuesday, July 27, 2010

त्या रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस...

 त्या रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस...


सकाळी उठलो तर वाटलं कुणी तरी भेटणार


आपल्या हृदयाचा ठाव कुणी तरी घेणार
योगायोगानेच आपली ओळख झाली
वाटलं मनाला कुणीतरी जवळची भेटली

मैत्रीच्या झाडात आपल्या लागले प्रेमाचे फळ
संकटांच्या क्षणीच नेमके दिले तू मला बळ
मैत्रीच्या नात्याला तू एक नविनच आयाम दिलं
एक अजुन बहिण भेटल्याने मन स्फंदून गेलं

पहिले रोज काही नविन घडत नव्हतं
आता मात्र सांगायलाही वेळ पुरत नव्हतं
काय सांगू काय नाही असं व्हायचं
तू समोर आलीस की सगळ विसरायला व्हायचं

आठवते का ग तुला पहिल्या राखिला तू मला राखी पाठवली नव्हतीस
सख्या भावांच्या गर्दित तू या मानलेल्या भावाला विसरली होतीस
विचारल तर म्हणालीस अरे घरी वेगळ वाटेल
तुझ्या माझ्या नात्याचं सत्य कस कोणी समजेल

तेव्हाच मी ठरवलं आपल्या मनाशी
एक वेळ अशी येईल जेव्हा तू मला धरशील उराशी
आठवेल तुला आपण क्षणोक्षणी किती भांडायचो
उगाचच खिलज्या पाडून पुन्हा मनवायचो

एके दिवशी नको तेच अघटित घडले
तुला तुझ्या रक्ताच्या नात्याचं कुणीतरी भेटले
अनवधानानी तू त्याच्याशी जवळीक करत गेलीस
रक्ताच्या भावापुढे मानलेल्या भावाला विसरून गेलीस

दिवसांमागुन आठवडे महीने निघून गेले
आपले मात्र बोलायाचे तसेच राहून गेले
एकदा भांडणाचा उद्रेक झाला
तुझ्या त्या रक्ताच्या भावाने आपला सम्पर्कच मिटवला

आजही तुझ्या आवाजाची वाट बघतोय
प्रेमाने "दाद्या" म्हणशील म्हणून रोजच मरतोय
एकदा ताई म्हणालो नाही याचा का एवढा बदला घेतलास
माझ्या वाटचा घास तू त्याच्या तोंडी भरवलास

कधीही विसरु नकोस आपल्या या भावाला
धाकटी बहिण असुनही तुला तिचाच दर्जा देणार्याला
कधी तरी माझी आठवण काढशील का ग
मानलेल्या या भावाला आठवशील ना ग

असशील तू दूर सध्या तरी माझ्या मनात राहशील
हाक तर मारून बाघ सदैव मला तुझ्यासाठी उभाच बघशील
मानलेल्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतं का ग रक्ताचं नातं
फुल तरी विसरते का आपल्या झाडाचं पातं

आपल्या प्रेमाला कधी विसरु नको
एव्हढच मागतो की त्या रक्ताच्या नात्याला तरी तोडू नकोस... 



एक मानलेल्या भावाच्या भावनांचा एका बहिणीने केलेला चुराडा या कवितेत व्यक्त केला आहे. खरच किती दुख:दायक असत जेव्हा आपलेच आपल्याशी असे वागतात. काय अधिकार आहे कोणाला असा आपल्या भावनांशी खेळण्याचा ?

Sunday, July 25, 2010

आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ...

मित्र 

मन मोकळ करायला....
 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

दुःखा चा  भार हलका करायला ....
 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

सुखा च्या दिवसांत Party करायला ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

एकटेपणा घालवायला .... सोबत ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

स्वतची चूक कबुल करायला ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

मला चुकल्यावर रागावणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

जुन्या आठवणी आणि नवीन स्वप्ने सांगणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

FaceBook च्या Photos मध्ये tag करणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

 Updated status ला comment देणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

twitter च्या twitts ला reply करणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

पावसात स्वतः थोडंसं भिजून ... मला छत्रीत घेणारं ...
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

Surprisingly Movie चा plan करणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

Shopping साठी माझ्या बरोबर अख्खा Mall फिरणारं ....
 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

Exams च्या वेळी लपून लपून Answer दाखवणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

रात्री १२.०० वाजता Birth -Day wish करून party मागणारं ....
 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

मी नसताना माझी आठवण काढणारं ....
 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

मी गेल्यावर माझ्यासाठी मनापासून रडणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

आणि त्या आपलं कोणीतरीचं रूप ...
मला तुझ्या चेहर्यात दिसतं ....




एका मित्राच किती छान वर्णन केल आहे या कवितेमध्ये. 

प्रत्येकालाच असा वाटत कि त्यालाही एक मित्र असावा, अगदी तसाच जसा या कवितांमध्ये चितारला गेला आहे. मला आनंद आहे कि असे माझेही काही मित्र आहेत. माझ्याच सारखे backbenchers.............!

Thursday, July 22, 2010

अशाच एका मित्राने त्याच्या गेलेल्या मित्रा साठी लिहिलेली एक छोटीशी कविता ....

 ... अजूनही ...


मला अजूनही असं वाटतं ...
तू जूनं  सगळ विसरून तू पुन्हा माझ्याशी बोलणार ...
आपली पुन्हा पहिल्या सारखी, 
घट्ट मैत्री होणार ...  

मी तुला चिडवनार,
तू नेहमी सारखच खोटं खोटं रागावनार ...
मग थोडसं हसून तू,
तुझा राग शांत झाल्याचं दाखवणार ....

मी कधी Tension मध्ये असताना ...
तुझा एखादा sms येणार ....
नकळतच माझ्या चेहर्या वर Smile देऊन ...
माझं Tension विसरवनार ....

आपण कधीतरी Movie चा plan करणार ...
पाहिजे ती Movie "House Full" म्हणून...
मी दूसरी चे Tickets काढणार ...
The End नंतर ती पकाऊ होती म्हणून तू मला ओरडत राहणार ...

कधी मला रडताना पाहून...
तुझं मन गहिवरून येइल, 
माझ्या पाठीवरून हात फिरवत ...
तू माझे डोळ्यातले अश्रु टिपशील ...

रस्त्याने चालता चालता ...
मी तुझ्या Call ची वाट पाहत असतो...
खरं सांगतो मित्रा .. तुझ्या आवाजातला ...
तू मला म्हटलेला Hello मला ऐकवासा वाटतो ...

कसं ना!! पटकन तू ...
मला तुझ्या लाइफ मधून काढून टाकलस,
पण तुला माझ्या लाइफ मधून काढून टाकायला ...
मला अजुन का नाही जमलं ...

तू परत येणार नाही ...
हे मला देखिल माहिती आहे ...
पण माझं मन माझं ऐकतच नाही...
तुझी वाट पाहणं थांबवतच नाही ...

मला वाटतं .... मी दिसल्यावर....
तू मागे वळून पाहशील ...
वळून पाहण्या एवढी  तरी जाणीव ...
तू आपल्या मैत्रि ची ठेवशील ...

Friday, July 16, 2010

रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त

रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त
सकाळ पासून वाट पाहणारा डब्बा केला मी फस्त
रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त
ओले होतात डोळे, जांभळ्या देऊन देऊन
घ्यावी एक डुलकी तर साहेब बघतो दुनकून

ऑफिस मधली दुपार, बंद पाडते नैसर्गिक घड्याळ
डोळे उघडून प्रभावी, होतात मानसिक हाल
डुबवून काढला चेहरा, पण झोप उडत नाही
काय करावे दुपारचे काहीच सुचत नाही

मी खुर्ची मध्ये, आणि वेळ पुढे-पुढे सरकत जाते
वेळेची गती, आणि माझी बुद्धिमत्ती संत होत जाते
अखंड काळाचे असतात एक ते तीन चे दोन तास
आणि मग कटिंग मारून संपतो दुपारचा वनवास



हि कविता माझी नाही पण मला चांगली वाटली म्हणून मी ब्लॉग वर टाकलेली आहे.


Tuesday, July 13, 2010

जीवनाचं सार ....!

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाहीजी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जीवनामध्ये ज्यात अर्थ नाही असे वाटते,
त्यातच खूप अर्थ भरलेला आहे हे शेवटी कळते
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते.....




जीवनाचा सार सांगणारी दुसरी कोणती कविता मी आजपर्यंत तरी कुठेही वाचलेली नाही. असो तुमच काय मत आहे या कवितेबद्दल ......?