Pages

Friday, July 16, 2010

रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त

रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त
सकाळ पासून वाट पाहणारा डब्बा केला मी फस्त
रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त
ओले होतात डोळे, जांभळ्या देऊन देऊन
घ्यावी एक डुलकी तर साहेब बघतो दुनकून

ऑफिस मधली दुपार, बंद पाडते नैसर्गिक घड्याळ
डोळे उघडून प्रभावी, होतात मानसिक हाल
डुबवून काढला चेहरा, पण झोप उडत नाही
काय करावे दुपारचे काहीच सुचत नाही

मी खुर्ची मध्ये, आणि वेळ पुढे-पुढे सरकत जाते
वेळेची गती, आणि माझी बुद्धिमत्ती संत होत जाते
अखंड काळाचे असतात एक ते तीन चे दोन तास
आणि मग कटिंग मारून संपतो दुपारचा वनवास



हि कविता माझी नाही पण मला चांगली वाटली म्हणून मी ब्लॉग वर टाकलेली आहे.


No comments: