Pages

Wednesday, June 15, 2011

Sarfarosh Dialogue in IT




Sarfarosh Dialogue in IT .....

Everyone of you may have seen the famous movie "Sarfarosh". There is a famous dialogue when Inspector Salim has to handover his all files related to a case to ACP Rathod.

These interactions are between a Junior Developer and Technical Architect. Comparing them with Sarfarosh movie's Inspector Salim and ACP Rathod. 


Well some one had sent me this mail don't know whose creativity is this but he must be some one who had gone throught that. Just posting here for fun. ;)



Architect                       : Kaise ho Junior Developer?
Junior Developer         :Thik hun Sir. Yeh document dene ke liye aaya thaa.
Architect                       : To tum is module pe kaam nahi karoge ?
Junior Developer         : Nahi Sir.
Architect                       : Aur yeh aapka faislaa hai?
Junior Developer         : Faislaa karney wala main kaun hotaa hun sir ?
Faislaa to aap bade log kartein hain.
Ek chotasa bug mere module mein nikal aataa hai, aur saarey project mein khusar pusar shuru ho jaati hai. Aur mujhe us module se hataa diya jaataa hai.
Kyun ? Kyun ke main Junior Developer hun.
Aur aaj aapka project crash ho jaata hai, koi kuch nahi bol rahaa.
Kyun, kyun ke aap Technical Architect ho. Ek badi post pe hain. Aur kisi badi company me kam kar chuke he.
Architect:                      Technical Architect. Badaa company. Aap jaante hain meri pichali company ko.
(types some url on browser and a website opens) Ye dekho ye he meri purani company. Yaha kam karata tha mein.
Jayiye puchiye waha kaise bana me Technical Architect?
bataa nahi paayenge aapko, kabhi der rat tak koi biatha nahi waha mere sath kam karate.
Aur woh, woh mera PL he, puchiye unse kaise bana wo PL bata nahi payenga.
Humdardi ke liye nahi kah rahaa hun. Lekin aap suniye.
Technical Architect banane ke liye, jee tod mehnat ki hai maine.
MBA ke liye chunaa gayaa thaa. Project Manager bankar aaraam ki jindagi guzaar saktaa thaa.
Lekin maine MCA chunaa. kadi mehnat ki. kamar tut jati thi kam karate karate, lekin kabhi kam adhura nahi cchoda. Kyun? Kyun ki har project bug free dekhnaa chaahtaa hun!
Aur main yeh aapse is liye nahi kah rahaa hun ke yeh mere ek module ka maamlaa hai. Nahi! Yeh mere project ka mamla hai.
Junior Developer         : mere project ka nahi hai?
Architect                       : shaayad nahi hai. Isi liye aap apni jimmedariyonse bhaag rahein hain.
Main is project ko apna project samajhtaa hun. Aur apnaa project bachaaney ke liye mujhe kisi Junior Developer ki jarurat nahi hai.

A Few days later:

Architect:                      Tum is module mein kya kar rahey ho Junior Developer?
Junior Developer:        kyun? Koi paabandi hai?
Isi script ko dhundh rahey ho naa aap.
Nahi mili naa. Agar mil bhi gayee to kya hoga?
Aapko to bug fix karke chahiye naa?
Yeh li jiye, Mil jaayegaa aaj.
Jaiye. Fix kar lijiye usko, script modify kar k.
Architect:                      Ruko Junior Developer. Meri baat suno.
Junior Developer:        aur kya sunayenge? Ab nahi sunugaa.
De to diya aapko bug fix karkey. Aur kya chahiye? Jaaiye bachaaiye apne project ko. Ab meri kya jarurat hai?
Architect:                      jarurat hai Junior Developer. Is project ko
bachaaney ke liye mujhe ek nahi, 10 Junior
Developer ki jarurat hai.
Junior Developer:        10 nahi sir, 10 hazaar milenge. Agar aap bharosaa
karenge to.
Meri baat suniye Sir. Phir kabhi kisi Junior Developer se mat kahnaa ye project uskaa apna project nahi.
Architect:                      nahi kahungaa, kabhi nahi kahungaa.


Thursday, June 2, 2011

Deployed my first Application on Microsoft Windows Azure

Deployed my first Application on Microsoft Windows Azure

Monday, April 4, 2011

तुम्ही कधी देवाला हसताना, खुश होताना पाहिलंय ............ ?


तुम्ही कधी देवाला हसताना, खुश होताना पाहिलंय ............ ?

तुम्ही कधी देवाला हसताना, खुश होताना पाहिलंय ............ ?
खुशीने बेभान होताना पाहिलंय ............ ?

हो सांगा ना पाहिलंय का ...... ?
मी पाहिलं आहे.
प्रत्यक्ष देवाला हसताना, खुशीने बेभान होताना ...... याची देही याची डोळा अनुभवला आहे.........

विश्वास नाही बसत ना ......      
स्वत:च बघा ..........









स्वप्नपूर्ती ............................

 स्वप्नपूर्ती

काय बोलू.......
काय लिहू......

keyboard समोर आहे, एरवी keyboard समोर आल्यावर सराईतपणे चालणारी बोटं आज धोका का देत आहे.......
काय झालाय तरी काय.......
साला डोकं पण काम करत नाही आहे.....
काही तरी लिहावं म्हणून सळसळ करणारा हात अन डोक आता keyboard समोर आल्यावर का बर काम करत नाही......

अहो कस करणार, वर्ल्ड कप जिंकलाय आपण.......
झिंग चढली आहे त्या विजयाची ..........
हात पाय दमलेत नाचून नाचून आणि घसा बसलाय इंडिया आणि सचिन चा जय जयकार करून.
कसलं विराट काम केलंय यांनी माहिती आहे का.....?

चक्क वर्ल्ड कप जिंकलाय आपण ............
याहू.............................................................
वर्णन करायला शब्द नाहीयेत आणि आपली भाषा इथे लिहू शकत नाही ना...... ;)

असो पण खरच अक्षरशः स्वप्नपूर्ती झालीय
आमच्या देवाची ........
सचिन तेंडूलकरची ...........
आणि पर्यायाने आमची...............






गेली २१ वर्ष सचिन ते स्वप्न घेऊन खेळत होता आणि आम्ही ते स्वप्न त्याच्या डोळ्यांनी पाहत होतो.......

गेली २१ वर्ष वाट पहिली त्याने वर्ल्ड कप जिंकण्याची आणि आम्ही तो वर्ल्ड कप सचिन च्या हातात पाहण्याची.......
गेली २१ वर्ष त्याने जीवाचे रान करून मेहनत घेतली आणि आम्ही ती मेहनत आमची झोप, कॅरिअर, काम बाजूला ठेवून बघितली.....

गेल्या २१ वर्षात भारत अनेक matches जिंकला, सचिनला आणि आम्हाला अनेकदा आनंद झाला, पण हि बातच काही और आहे.................

सचिन ला पहिल्यांदाच इतका खुश बघतोय....

त्याच्या डोळ्यातला आनंद भरभरून डोळ्यात साठवतोय......

गेली २१ वर्ष त्याला ज्या स्वप्नाने झपाटलं होत ते आता साकार झालाय........





Thanks to इंडियन टीम.........

Thanks to गौतम गंभीर, विराट कोहली, धोनी, युवराज, रैना, आणि इतर ..........


 कसले खेळले आहात तुम्ही......
माहोल यार.............................

मनापासून धन्यवाद...................... तुम्हा सगळ्यांना ...........................
cheers......................................

Thanks Gauti पुन्हा एकदा कारण तुझ्यामुळेच आज भारताला वर्ल्ड कप मिळाला आहे.

तुझ्यामुळेच आम्ही इतका खुश बघतोय सचिनला ...............





Wednesday, March 16, 2011

Software Engineers Dialogue


Some Dialogues of famous hindi movies in context of software engineer

Sunny Deol:    
Chaddha samjao ise....
Coding karne ke liye jo jigar chahiye hota hai 
wo  kisi bazaar mein nahi milta...
Coder use lekar paida hota hai....
 

Sunny Deol: 
   
Aur jab yeh Java ka code kisi Dotnet wale ko karna pad jata hai na,
Toh coder uth ta nahi, balki is duniya se uth jaata hai............
 

Bang Bang Bang...(on the keyboard)... 

Sunny Deol:    
Bench pe bench, bench pe bench, Log paglon ki tarah training mein raat raat bhar padhte rahe aur unhe mili toh sirf bench!          
Analysis of algorithm karte karte unki khudki life ban gayi ek unsolvable algorithm aur unhe bhi mili to sirf bench!  
Training ke baad proj milega, phir appraisal hoga, phir onsite jaoonga isi soch mein logon ne training clear kar di aur unhe bhi mili toh sirf bench!
Bench par baithe baithe log khud ban gaye hai ek bench, aur phir bhi unhe mili toh  bench!
 

Nana Patekar
Ye dekho ...
Ye 'C' ka code.. ye 'C++' ka code... Ye dono mila diya...
Ab bata saale tester - 'C' ka kaunsa, 'C++' ka kaunsa???
Jab banane waale ne ismein koi farak nahi kiya to tum kaun ho farak karne waale.... Bata bata
 

RajKumar :

Jaani,
Jinke khud ke code DOT NET mein hote hai,
Woh JAVA ko certification nahi diya karte!!   


Paro  : 

Ek Chutki code ki keemat tum kya jaano Tester Babu?
Ishwar ka ashirwaad hota hai ek chutki code
Developer ke sar ka taj hota hai ek chutki code
Har bench resource ka khwaab hota hai ek chutki code



Shahrukh Khan :
Hamari Hindi filmon ki tarah hamare
Projects mein aakhir tak sab kuch theek ho jaata hai ......
Happyzz Endingzzz ......
Aur agar aisa na ho to samjho
Project abhi baaki hai mere DOST ......

Sunny Deol:  
Bazaar main aise code bhot milte lekin unko chalane k liye jo seena chaiye hota hai who ek coder lekar paida hta hai 



a forwarded email.....

Monday, March 14, 2011

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...

महाश्वेता ही मालिका आठवत असेल तर..
अप्रतिम गाणे आहे..
मनाला खरच सुख देणारं हे गाणं...
कविवर्य ग्रेस, पंडित हृदयनाथजी आणि लताजी असा हा त्रिवेणी संगम...
ह्या गाण्याचे बोल बरेच दिवस हवे होते, अवचित मिळाल्याचा आनंद झाला. गाणं खुपचं अर्थपुर्ण आहे, आणि गोडही.
भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई...




Thursday, March 10, 2011

प्रिय महेंद्रसिग धोनी यांस.....

प्रिय महेंद्रसिग धोनी यांस.....

प्रिय महेंद्रसिग धोनी यांस,
सनविवी


नुकताच क्रिकेट चा कुंभमेळा आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झालेला. १०० करोड भारतीय नागरिकांच्या आशा आणि अपेक्षा तुझ्यावर एकवटल्या आहे. तुला १ उत्तम संघ मिळाला आहे ज्याचा तू कर्णधार आहेस. तुझ्या संघात

१. सचिन तेंडूलकर (साक्षात क्रिकेट चा परमेश्वर),
२. वीरेंद्र सेहवाग (परमेश्वराचाच छोटासा अवतार),
३. हरभजन सिंग (सध्या याला भारतातला एकमेव चांगला फिरकीपटू म्हणतात),
४. युवराज सिंग (याला बॉल मैदानाबाहेर भिरकवायला फार आवडतो),
५. विराट कोहली (हा सगळ्यांना राहुल द्रविड च प्रतिरूप वाटतो (?)),
६. सुरेश रैना (उगवता तारा),
७. युसुफ पठाण (पठाणी तडाखा देण्यात वाकबगार, आजकाल  बॉलर याला बोलिंग करायला घाबरतात),
८. मुनाफ पटेल (भारताचा सगळ्यात फास्ट बॉलर),
९. पियुष चावला (भारतीय फिरकी याच्याकडे भविष्य म्हणून बघतेय),
१०. जहीर खान (भारताचा एकमेव पेस बॉलर)
आणि
तू स्वत:.

कागदोपत्री एक चांगला व तगडा दिसत असलेला हा संघ. प्रत्येकामध्ये कौशल्य ठासून भरलेले. प्रत्येकजण शेरास सव्वाशेर. कित्येकांच्या नावावर वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड्स.

अरे जेव्हापासून भारतीय उपमहाखंडात वर्ल्ड कप होणार आहे हे माहिती झाल तेव्हापासून आमच्या सारख्या करोडो लोकांना दिसतेय एकच गोष्ट,
रोषणाइने झळाळून गेलेले आकाश,
लाखो करोडो लोकांचा जल्लोष,
आणि त्याच्या मध्यभागी झळाळता चषक उंचावणारा तू,
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार.

गेले २९ वर्ष जे स्वप्न प्रत्येक क्रिकेट वेड्याने पहिले ते साकारताना आणि तो अत्युच्च सोहळा बघणार उभं जग.
साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड यांच्या नाकावर टिच्चून भारताने जिंकलेला तो वर्ल्ड कप.
२००७ च्या अविश्वसनीय कामगिरी नंतर गेले ४ वर्ष प्रत्येक भारतीय हेच स्वप्न उराशी घेऊन तुमच्याकडे आशेने बघतोय. प्रत्येकाच्या ध्यानी मनी फक्त वर्ल्ड कप.
जरा चाहुबाजुकडे बघ, किती उत्साह ओसंडून वाहतोय वर्ल्ड कपचा. अक्खा देश क्रिकेटमय होऊन गेला आहे. सगळ्यांनी प्रत्येक सामना पाहायची आपली आपली वेगळी सोय केलेली आहे. प्रत्येक जण मनपासून प्रार्थना करतोय त्याचं स्वप्न पूर्ण होईल भारतीय संघ जगजेत्ता झालेला बघायचं. 

पण गेल्या ४ सामन्यात जे झाले ते अगदी या आशा-अपेक्षा यांचा चुराडा करणार होत. जेव्हा पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हे संघ बाकी संघाना अक्षरशः चिरडून टाकत असताना
तेव्हा भारतीय संघ मात्र विजयासाठी झगडताना दिसत आहे.
पहिल्या सामन्यात सचिन दुर्दैवीरीत्या धावबाद झाल्यानंतर वीरू ने एकहाती सामना तोलला आणि भारताला एक बलाढ्य धावसंख्या उभारून दिली. पण हाय रे दुर्दैव. आमचे बोलर्स बांगलादेशच्या १० विकेट्स घेण्यासही झगडताना दिसले. बांगलादेशने शेवटपर्यंत लढा देत ५० ओव्हर मध्ये २८३ धावा काढल्या आणि ते पण त्यांची १ विकेट बाकी असताना आणि पहिल्यांदाच धोक्याची घंटा वाजली.
इंग्लंड विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये सचिन ने १२० धावा करीत ३२८ धावांचं आव्हान उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला  पण पुन्हा एकदा आपल्या बोलर्स नी कच खाल्ली. आणि इतकी मोठी धावसंख्या उभारूनही सामना अनिर्णीत झाला.
तिसरा सामना आयर्लंड सोबतचा. २०७ धावांचं माफक आव्हान पार करायला 46 ओवर लागल्या. तेही नशीब आमचं की युसुफ नी आल्याआल्याच फटकेबाजी केली  म्हणून ते टारगेट क्रॉस करू शकलो नाही तर तिथेही जिंकण्याचे वांधेच होते.
चौथा सामना कालचा नेदरलंड सोबत. तिथेही तसच १९० च रन बनवायला ३६ ओवर.

भारतीय मैदानावर भारतीय वाघ किती हिंस्त्र होतात हे सगळ्यांना अनुभवावरून माहिती आहे. पण या ४ सामन्यात हिंस्त्रपणा सोडा पण आपलीच शेपूट वाचवायची पाळी आपल्यावर आली. अस का रे ?

तूच सांगितलास न काही दिवस आधी की, आम्हाला सचिन साठी कप जिंकायचा आहे, पण कुठे आहेत प्रयत्न ? समोरच्या लेच्यापेच्या टीम ला चीराडता आलं नाही तुम्हाला, काय सचिन साठी वर्ल्ड कप जिंकणार तुम्ही.  अजून त मोठ्या टीम सोबत सामने व्हायचेच आहेत तेव्हा काय करणार ? सध्याच्या बोलिंग च्या भरोश्यावर जर का तू वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहत असशील त उठ अन जागा हो.

आम्हाला बघायचं आहे,
तू तो झळाळता चषक,
भारतीय खेळाडूंनी उंचावलेला,
मैदानावर जल्लोषाच वातावरण आहे,
फटाक्यांची आतिषबाजी होतेय,
रस्ते लोकांनी ओसंडून वाहतायेत,
प्रत्येक जण खुशीने बेभान आहे,
धमन्यातून धमन्यातून चैतन्य वाहत आहे,
कोपऱ्या कोपऱ्या वर लोक तिरंगा घेऊन मिरवत आहेत,
चुहुकडून एकाच आवाज येतोय,
"भारत माता की जय",
"भारत माता की जय",......!



इतक करशील का रे आमच्यासाठी, नाही आमच्यासाठी तर त्या क्रिकेट च्या परमेश्वरासाठी तरी कर ....
करशील का हे स्वप्न साकार ?

बाकी काही नाही फक्त प्रयत्न तरी दाखव खरच तुम्हाला जिंकायचा आहे वर्ल्ड कप सचिन साठी.... आपल्या सचिन साठी. कारण बहुतेक हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप.......
जगातील किती तरी रेकॉर्ड्स स्वताच्या नावावर करणारा सचिन वर्ल्ड कप विजेत्या संघात असावा हि त्याचीच नाही तर १०० कोटी भारतीयांची इच्छा आहे.




तुला नाही वाटत तुझ्या कप्तानीखाली भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यावा, आणि अभिमानानी सांगाव भारतासाठी २९ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा मी कप्तान आहे आणि आम्ही तो वर्ल्ड कप जिंकला आहे फक्त सचिन ला भेट देण्यासाठी ........................
त्याच्या कारकीर्दीवर सुवर्ण कळस चढवण्यासाठी ....................






Please  इतकंच कर आमच्यासाठी..... सचिन साठी...... तुझ्यातल्या सचिन प्रेमीसाठी ..........


एक सचिन प्रेमी



Wednesday, February 23, 2011

डिअर गलर्फ्रेण्डस...डिअर कलिग्ज...डिअर बॉस...

डिअर गलर्फ्रेण्डस...डिअर कलिग्ज...डिअर बॉस...
नुकताच १९ तारखेपासून क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झाला आहे. तमाम भारतीय प्रेक्षकांचं क्रिकेट वेड लक्षात घेता खाली त्यांच्या निकटवर्तीयांसाठी  काही सूचना (धमक्या ? समज आपली आपली..!)....!

कृपया आई, वडील, भाऊ, बहिण, girlfriend (असल्यास, बहुतेक सगळ्यांना असतेच. नसलेल्यांनी काळजी करू नये त्यांच्या मैत्रीणीना आम्ही यात include केल आहे.)  या सगळयांना हि नम्रतेची विनंती आहे कि पुढील सूचना काळजी पूर्वक वाचून पाठ कराव्या व कृपया आमच्या आणि क्रिकेट च्या मध्ये येऊ नये अन्यथा परिणाम काय होतील याची guaranty आम्ही घेणार नाही. 

डिअर गलर्फ्रेण्डस...
१) पुढचा सर्व महिनाभर मी फक्त माझ्या मित्रांशीच जास्तीत जास्त वेळ बोलेन. त्यांच्या घरी मॅच पहायला जाईन किवा त्यांना माझ्या घरी बोलवेन.. त्यामुळे तुला माझ्यासाठी वेळच नाही ही भुणभुण करायची नाही. केल्यास दुर्लक्ष केले जाईल.
२) माझा फोनही याकाळात बिझी असेल तेव्हा फोन घेतला नाही म्हणून सतत करायचा नाही एसएमएस पाठवायचे नाहीत. इग्नोरच केले जातील. फोन बिझी असला तर मी क्रिकेटवर चर्चा करतोय असे वाटून गप्प बसायचे.
३) समजा, एखाद्या दिवशी मी भेटलोच. भेटेनच असे नाही, मॅच बुडवून तुला भेटायला येण्याचे कष्ट मी घेणार नाही. पण तरी आलोच एखाद्या मॅचच्या दिवशी आणि नाही फार बोललो तर त्याचे भलतेसलते अर्थ काढायचे नाहीत. तुझे माझ्यावर प्रेमच नाही, तू दुसरीकडे कुठं अडकलास का, तू का असा वागतोस माझ्याशी, अशी भंकस करायची नाही. मी काहीही ऐकून न घेता निघून जाईन आणि वर्ल्डकप संपेपर्यंत भेटणार नाही.
४)भेटणे-जेवायला जाणे-पार्ट्या-तुझ्या मैत्तिणींचे वाढदिवस असे सगळे कार्यक्रम रहित करण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा आग्रह करण्यात येऊ नये.
५) सगळ्यात महत्वाचं, तुला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही असं सांगण्याची वेळ माझ्यावर आणायची नाही. 'आज कोणाची मॅचे..?' असं लाडात येऊन विचारल्यास आपलं ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. किमान रोजचा पेपर वाचायचा, किमान भारताची मॅच कधी आहे हे पहायचं..आणि प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत.
६) मुलींना फारसं क्रिकेट कळत नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे उगीच आपल्याला फार कळतं अशा अविर्भावात माझ्याशी चर्चा करायला यायचं नाही. चर्चा केली जाईल, पण तेव्हा मी जे काही सांगतोय ते केवळ भक्तीभावानं ऐकून घ्यायचं. क्रिकेटविषयी क्रिकेट सोडून बोलायला तू काही मंदिरा बेदी नाहीस हे लक्षात ठेवायचं.
७) मी मॅच पाहत असताना फोन करुन 'रोमॅण्टिक' गप्पा मारण्याचा प्रयत्नही करायचा नाही. मॅचमधला रोमॅण्टिसिझम मला पुरतो.
८) सचिन तेंडुलकर कितीही आवडत असला तरी ' ए, हा मारेल का आज सेंच्युरी..?' असले बावळट प्रश्न विचारायचे नाहीत..बावळट यासाठी की तेव्हा सचिन नाही तर सेहवाग किंवा युसुफच क्रिझवर असतो..उगीच 'स्मार्ट'नेस दाखवायचा नाही.
९) प्रेमापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं असतं हे तू लक्षात ठेव, त्यामुळे 'तूला माझ्यापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं वाटतं का..?' असा प्रश्न विचारायचा नाही. मी होकारार्थी उत्तर दिल्यास परिणामांना जबाबदार राहणार नाही.
१०) सगळ्यात महत्वाचं..हे सगळे नियम पाळले गेल्यास आणि माझ्या मनाप्रमाणे सगळ्या मॅचेसचे निकाल लागत गेल्यास मी कधीमधी एखादा फोन करीन..तेव्हा तू प्रेमाने आणि ( थोडावेळच)बोलणे बंधनकारक आहे.

डिअर कलिग्ज...
खरं तर सरळ सरळ मित्रांनो (आणि मैत्रिणींनो) असंच म्हणणार होतो, पण माझ्या ऑफिसातले सहकारी तुम्ही..तुम्हाला मित्र म्हणण्याचं धाडस कोण करणार..?
तर माझ्या अतीप्रिय सहकाऱ्यांनो..मी जे बॉसला पत्र पाठवलंय तसंच तुम्हालाही पाठवतो आहे..पण तेवढंच तुमच्यासाठी पुरेसं नाही. आपला बॉस चांगला आहे तसा, त्याला कण्ट्रोल करणं सोपं पण तुम्ही म्हणजे स्वत:ला युसुफ पठाणच समजता..लागता ठोकम्ठोक करायला. बट प्लिज लेट मी टेल यू फ्रँकली..जरा तोंडाला झिप लावा..आणि थोडंसं ऐकून घ्या इतरांचंही. पण तुम्ही माझंच काय पण मी सुद्धा तुमचं ऐकून घेत नाही. वर्ल्डकप तिकडे आणि तिसरं महायुद्ध इकडे असं होऊ नये असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनीच आपल्यासाठी काही 'आचारसंहिता' का तयार करून घेऊ नये..
१) आपण सगळे हे एकमतानं मान्य करून टाकू की आपल्याला सगळ्यांना क्रिकेट खूप कळतं, सचिन तेंडुलकरपेक्षाही जास्त कळतं..त्यामुळे ' तुला काय कळतं, गप्प बस..असं कुणीही कुणाला म्हणणार नाही..'
२) चेंडू 'वाईड' होता की नव्हता, रन आऊट कसा चुकीचा दिला या क्षुल्लक कारणावरून कुणीही चिडणार नाही.
३) 'आज इंडिया हारणारच..' असं जो तावातावाने म्हणेल आणि नाट लावेल त्याचं यावर्षी अॅप्रायझलच काय पण काहीच धड होऊ नये याची काळजी घेण्यात येईल.
४) मॅच पाहणं हा आपल्या सगळ्यांचाच जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो आपण बजावणारच..पण म्हणून 'थोडे'ही काम न करण्याचा त्रास करून घेऊ नये, किमान आपले काम तरी करावेच..
५) झिम्बाम्ब्वे आणि नेदरलॅण्डची मॅच पाहणंही 'मस्ट' असेल तेव्हा ज्या सहकाऱ्यांना क्रिकेट आवडत नाही; त्यांनी कृपया शांत रहावे. मौन व्रत आरोग्यासाठी उत्तम असते..ते पाळले तर बरे..! 

डिअर बॉस...
हे 'वर्ल्डकप'चे दिवस आहेत हे तुम्हाला माहिती असेलच.. (नसेलही कदाचित, तसंही तुम्हाला जगातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात..!)
वर्ल्डकपच्या काळातही मी कम्प्युटरला नाक चिकटवून काम करावं, उत्तम परफॉर्म करावं आणि ऑफिसला वेळेवर यावं असं तुम्हाला वाटत असेल..! असेलच..!
त्या 'वाटण्याला' माझी काहीच ना नाही; पण मी येत्या महिनाभर काम 'करावं' असं वाटत असेल तर कृपया काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात ही विनंती..!

१) मॅच सुरू असताना उगीच खतरुड 'लूक' देऊ नये; तुम्ही तसा 'लूक' दिला आणि तिकडे सचिन आऊट झाला तर मी राजीनामा देण्याचं टोक गाठण्याचीही शक्यता आहे.
२) मॅच सुरू होण्यापुर्वी आणि संपल्यानंतरच काय ती कामं सांगावी, प्लॅनिगच्या मिटिगा कराव्या; त्या मिटिगा लवकर संपवाव्या. अगदी नाईलाज म्हणून मी मॅच सुरू असतानाही मिटिगला येईन पण तेव्हाही स्कोअर काय झाला हे मोबाईलवर पाहीन किवा सहकाऱ्यांना विचारेन. त्या स्कोअरप्रमाणे माझे मूड्स बदलतील तेव्हा प्लिज..
३) मूड्सवरून आठवलं; येत्या महिन्याभराच्या काळात मी 'नॉर्मल' नसेन तेव्हा माझ्याशी बोलताना जरा जपून..! इंडिया जिकत असेल तर मी अती एक्साईट असेन आणि त्या एक्साईण्टपोटी कामच करणार नाही, इंडिया दुर्देवानं हरली एखादी मॅच तर माझं डोकं तडकेल..
४) मॅच ही गप्प बसून पाहण्याची गोष्ट नसते, मी क्रिकेटचा एक्सपर्ट आहे. आपल्या ऑफिसातला हर्ष भोगले आहे असं समजा हवं तर, माझ्यासारखे असे अनेक हर्ष, श्रीकांत, आणि मंदिरा बेदीही आपल्या ऑफिसात आहेत. आम्ही चर्चा करणार, एक्स्पर्ट कमेण्ट देणार, वाद होणार..
५) अॅण्ड लास्ट बट नॉट द लिस्ट...एन्जॉय धिस वर्ल्डकप..पुढच्या वर्षी कदाचित सचिन खेळणार नाही..तेव्हा प्लीज..ट्राय अॅण्ड बी देअर विथ अस..!
     

वरील सर्व सूचना काही दिवस आधीच्या लोकमत पेपर च्या Oxygen या पुरवणीत प्रकाशित झाल्या आहेत. आपणाजवळ अजून काही असतील तर नक्कीच comments मध्ये add करा.