Pages

Thursday, March 10, 2011

प्रिय महेंद्रसिग धोनी यांस.....

प्रिय महेंद्रसिग धोनी यांस.....

प्रिय महेंद्रसिग धोनी यांस,
सनविवी


नुकताच क्रिकेट चा कुंभमेळा आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झालेला. १०० करोड भारतीय नागरिकांच्या आशा आणि अपेक्षा तुझ्यावर एकवटल्या आहे. तुला १ उत्तम संघ मिळाला आहे ज्याचा तू कर्णधार आहेस. तुझ्या संघात

१. सचिन तेंडूलकर (साक्षात क्रिकेट चा परमेश्वर),
२. वीरेंद्र सेहवाग (परमेश्वराचाच छोटासा अवतार),
३. हरभजन सिंग (सध्या याला भारतातला एकमेव चांगला फिरकीपटू म्हणतात),
४. युवराज सिंग (याला बॉल मैदानाबाहेर भिरकवायला फार आवडतो),
५. विराट कोहली (हा सगळ्यांना राहुल द्रविड च प्रतिरूप वाटतो (?)),
६. सुरेश रैना (उगवता तारा),
७. युसुफ पठाण (पठाणी तडाखा देण्यात वाकबगार, आजकाल  बॉलर याला बोलिंग करायला घाबरतात),
८. मुनाफ पटेल (भारताचा सगळ्यात फास्ट बॉलर),
९. पियुष चावला (भारतीय फिरकी याच्याकडे भविष्य म्हणून बघतेय),
१०. जहीर खान (भारताचा एकमेव पेस बॉलर)
आणि
तू स्वत:.

कागदोपत्री एक चांगला व तगडा दिसत असलेला हा संघ. प्रत्येकामध्ये कौशल्य ठासून भरलेले. प्रत्येकजण शेरास सव्वाशेर. कित्येकांच्या नावावर वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड्स.

अरे जेव्हापासून भारतीय उपमहाखंडात वर्ल्ड कप होणार आहे हे माहिती झाल तेव्हापासून आमच्या सारख्या करोडो लोकांना दिसतेय एकच गोष्ट,
रोषणाइने झळाळून गेलेले आकाश,
लाखो करोडो लोकांचा जल्लोष,
आणि त्याच्या मध्यभागी झळाळता चषक उंचावणारा तू,
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार.

गेले २९ वर्ष जे स्वप्न प्रत्येक क्रिकेट वेड्याने पहिले ते साकारताना आणि तो अत्युच्च सोहळा बघणार उभं जग.
साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड यांच्या नाकावर टिच्चून भारताने जिंकलेला तो वर्ल्ड कप.
२००७ च्या अविश्वसनीय कामगिरी नंतर गेले ४ वर्ष प्रत्येक भारतीय हेच स्वप्न उराशी घेऊन तुमच्याकडे आशेने बघतोय. प्रत्येकाच्या ध्यानी मनी फक्त वर्ल्ड कप.
जरा चाहुबाजुकडे बघ, किती उत्साह ओसंडून वाहतोय वर्ल्ड कपचा. अक्खा देश क्रिकेटमय होऊन गेला आहे. सगळ्यांनी प्रत्येक सामना पाहायची आपली आपली वेगळी सोय केलेली आहे. प्रत्येक जण मनपासून प्रार्थना करतोय त्याचं स्वप्न पूर्ण होईल भारतीय संघ जगजेत्ता झालेला बघायचं. 

पण गेल्या ४ सामन्यात जे झाले ते अगदी या आशा-अपेक्षा यांचा चुराडा करणार होत. जेव्हा पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हे संघ बाकी संघाना अक्षरशः चिरडून टाकत असताना
तेव्हा भारतीय संघ मात्र विजयासाठी झगडताना दिसत आहे.
पहिल्या सामन्यात सचिन दुर्दैवीरीत्या धावबाद झाल्यानंतर वीरू ने एकहाती सामना तोलला आणि भारताला एक बलाढ्य धावसंख्या उभारून दिली. पण हाय रे दुर्दैव. आमचे बोलर्स बांगलादेशच्या १० विकेट्स घेण्यासही झगडताना दिसले. बांगलादेशने शेवटपर्यंत लढा देत ५० ओव्हर मध्ये २८३ धावा काढल्या आणि ते पण त्यांची १ विकेट बाकी असताना आणि पहिल्यांदाच धोक्याची घंटा वाजली.
इंग्लंड विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये सचिन ने १२० धावा करीत ३२८ धावांचं आव्हान उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला  पण पुन्हा एकदा आपल्या बोलर्स नी कच खाल्ली. आणि इतकी मोठी धावसंख्या उभारूनही सामना अनिर्णीत झाला.
तिसरा सामना आयर्लंड सोबतचा. २०७ धावांचं माफक आव्हान पार करायला 46 ओवर लागल्या. तेही नशीब आमचं की युसुफ नी आल्याआल्याच फटकेबाजी केली  म्हणून ते टारगेट क्रॉस करू शकलो नाही तर तिथेही जिंकण्याचे वांधेच होते.
चौथा सामना कालचा नेदरलंड सोबत. तिथेही तसच १९० च रन बनवायला ३६ ओवर.

भारतीय मैदानावर भारतीय वाघ किती हिंस्त्र होतात हे सगळ्यांना अनुभवावरून माहिती आहे. पण या ४ सामन्यात हिंस्त्रपणा सोडा पण आपलीच शेपूट वाचवायची पाळी आपल्यावर आली. अस का रे ?

तूच सांगितलास न काही दिवस आधी की, आम्हाला सचिन साठी कप जिंकायचा आहे, पण कुठे आहेत प्रयत्न ? समोरच्या लेच्यापेच्या टीम ला चीराडता आलं नाही तुम्हाला, काय सचिन साठी वर्ल्ड कप जिंकणार तुम्ही.  अजून त मोठ्या टीम सोबत सामने व्हायचेच आहेत तेव्हा काय करणार ? सध्याच्या बोलिंग च्या भरोश्यावर जर का तू वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहत असशील त उठ अन जागा हो.

आम्हाला बघायचं आहे,
तू तो झळाळता चषक,
भारतीय खेळाडूंनी उंचावलेला,
मैदानावर जल्लोषाच वातावरण आहे,
फटाक्यांची आतिषबाजी होतेय,
रस्ते लोकांनी ओसंडून वाहतायेत,
प्रत्येक जण खुशीने बेभान आहे,
धमन्यातून धमन्यातून चैतन्य वाहत आहे,
कोपऱ्या कोपऱ्या वर लोक तिरंगा घेऊन मिरवत आहेत,
चुहुकडून एकाच आवाज येतोय,
"भारत माता की जय",
"भारत माता की जय",......!



इतक करशील का रे आमच्यासाठी, नाही आमच्यासाठी तर त्या क्रिकेट च्या परमेश्वरासाठी तरी कर ....
करशील का हे स्वप्न साकार ?

बाकी काही नाही फक्त प्रयत्न तरी दाखव खरच तुम्हाला जिंकायचा आहे वर्ल्ड कप सचिन साठी.... आपल्या सचिन साठी. कारण बहुतेक हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप.......
जगातील किती तरी रेकॉर्ड्स स्वताच्या नावावर करणारा सचिन वर्ल्ड कप विजेत्या संघात असावा हि त्याचीच नाही तर १०० कोटी भारतीयांची इच्छा आहे.




तुला नाही वाटत तुझ्या कप्तानीखाली भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यावा, आणि अभिमानानी सांगाव भारतासाठी २९ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा मी कप्तान आहे आणि आम्ही तो वर्ल्ड कप जिंकला आहे फक्त सचिन ला भेट देण्यासाठी ........................
त्याच्या कारकीर्दीवर सुवर्ण कळस चढवण्यासाठी ....................






Please  इतकंच कर आमच्यासाठी..... सचिन साठी...... तुझ्यातल्या सचिन प्रेमीसाठी ..........


एक सचिन प्रेमी



No comments: