Pages

Tuesday, December 28, 2010

क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणांचा। मग पुढें॥...........

प्रेम आणि मरण - गोविंदाग्रज

कुठल्याशा जागी देख।
मैदान मोकळे एक॥ पसरले॥
वृक्ष थोर एकच त्यात।
वाढला पुर्या जोमात॥सारखा॥
चहुकडेच त्याच्या भंवते।
गुडघाभर सारे जग तें॥तेथले॥
झुडुपेंच खुरट इवलालीं।
मातीत पसरल्या वेली॥माजती॥
रोज ती। कैक उपजती। आणखी मरती।
नाहिं त्या गणती। दादही अशांची नव्हती॥त्याप्रती॥

त्यासाठी मैदानात।
किती वेली तळमळतात॥ सारख्या॥
परि कर्माचें विंदान।
काहीं तरि असतें आन॥ चहुंकडे॥
कोणत्या मुहूर्तावरती।
मेघात वीज लखलखती। नाचली॥
त्या क्षणी। त्याचिया मनीं। तरंगति झणीं।
गोड तरि जहरी। प्रीतीच्या नवथर लहरी॥ न कळता॥

तो ठसा मनावर ठसला।
तो घाव जिव्हारीं बसला॥ प्रीतिचा॥
वेड पुरें लावी त्याला।
गगनातिल चंचल बाला। त्यावरी॥
जातिधर्म त्याचा सुटला।
संबंध जगशीं तुटला॥ त्यापुढें।
आशाहि। कोणती कांही। रहिली नाही।
सारखा जाळी। ध्यास त्यास तीन्ही काळी॥ एक तो॥

मुसळधार पाउस पडला।
तरि कधीं टवटवी त्याला॥ येइना॥
जरि वारा करि थैमान।
तरि हले न याचें पान॥ एकही॥
कैकदा कळ्याही आल्या।
नच फुलल्या कांही केल्या॥ परि कधीं॥
तो योग। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।
लागला ज्याला। - लागतें जगावें त्याला॥ हें असें!॥

ही त्याची स्थिति पाहुनिया।
ती दीड वीतिची दुनिया॥ बडबडे॥
कुणी हंसे कुणी करि कींव।
तडफडे कुणाचा जीव॥ त्यास्तव॥
कुणि दयाहि त्यावरि करिती।
स्वर्गस्थ देव मनिं हंसती॥ त्याप्रती॥
निंदिती। कुणी त्याप्रती। नजर चुकविती।
भीतिही कोणी। जड जगास अवघड गोणी॥ होइ तो॥

इष्काचा जहरी प्याला।
नशिबाच्या ज्याच्या आला॥ हा असा॥
टोंकाविण चालू मरणें।
ते त्याचे होतें जगणें॥ सारखें॥
ह्रदयाला फसवुनि हंसणें।
जीवाला न कळत जगणें॥ वरिवरी॥
पटत ना। जगीं जगपणा। त्याचिया मना॥
भाव त्या टाकी। देवांतुनि दगडचि बाकी॥ राहतो॥


यापरी तपश्चर्या ती।
कीती झाली न तिला गणती राहिली॥
इंद्राच्या इन्द्रपदाला।
थरकांप सारखा सुटला॥ भीतिने॥
आश्चर्ये ऋषिगण दाटे।
ध्रुवबाळा मत्सर वाटे॥ पाहुनी॥
तों स्वतां। तपोदेवता। काल संपतां।
प्रकटली अंती। "वरं ब्रूहि" झाली वदती॥ त्याप्रती॥

"तप फळास आलें पाही।
माग जें मनोगत कांही॥ यावरी॥
हो चिरंजीव लवलाही।
कल्पवृक्ष दुसरा होई॥ नंदनीं॥
प्रळयींच्या वटवृक्षाचें।
तुज मिळेल पद भाग्याचें। तरुवरा॥"
तो वदे। "देवि सर्व-दे,। हेंच एक दे-।
भेटवी मजला। जीविंच्या जिवाची बाला॥ एकदा॥"
सांगती हिताच्या गोष्टी।
देवांच्या तेतिस कोटी॥ मग तया॥
"ही भलती आशा बा रे॥
सोडि तूं वेड हें सारें॥ घातकी॥
स्पर्शासह मरणहि आणी।
ती तुझ्या जिवाची राणी॥ त्या क्षणीं॥
ही अशी शुध्द राक्षसी। काय मागसी।
माग तूं कांहीं। लाभले कुणाला नाही॥ जें कधीं॥"

तो हंसे जरा उपहासें।
मग सवेंच वदला त्रासें॥ त्याप्रती॥
"निष्प्रेम चिरंजीवन तें।
जगिं दगडालाही मिळतें॥ धिक तया॥
क्षण एक पुरे प्रेमाचा।
वर्षाव पडो मरणांचा। मग पुढें॥"
निग्रहें। वदुनि शब्द हे। अधिक आग्रहें!
जीव आवरुनी। ध्यानस्थ बैसला फिरुनी॥ वृक्ष तो॥

तो निग्रह पाहुनि त्याचा॥
निरुपाय सर्व देवांचा॥ जाहला॥
मग त्याला भेटायाला।
गगनांतिल चंचल बाला॥ धाडिली॥
धांवली उताविळ होत।
प्रीतीची जळती ज्योत॥ त्याकडे॥
कडकडे। त्यावरी पडे। स्पर्श जों घडे।
वृक्ष उन्मळला। दुभंगून खालीं पडला॥ त्या क्षणीं॥
दुभंगून खालीं पडला।
परि पडतां पडतां हंसला॥ एकदा॥
हर्षाच्या येउन लहरी।
फडफडुनी पानें सारीं॥ हांसलीं॥
त्या कळ्या सर्वही फुलल्या॥
खुलल्या त्या कायम खुलल्या॥ अजुनिही॥

तो योग्। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।
लागला ज्याला। लाभतें मरणही त्याला॥ हें असें॥
गोविंदाग्रज

गोविन्दग्रजांची ही कविता नेहमीच मला भुरळ घालते. उत्कट प्रेमाच हे खुपच छान उदहारण आहे. 

Monday, December 20, 2010

तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर्स?

तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर्स?

तुम्ही वेबसाईट किंवा ब्लॉग चालवता? मग तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर्स आहे हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

किती असेल तुमच्या वेबसाईटची किंमत? शून्य डॉलर, एक डॉलर, पाच डॉलर, दहा डॉलर, शंभर डॉलर की त्याहून अधिक?


तुमच्या वेबसाईटची किंमत जाणून घ्यायला आता तुम्ही उत्सुक झाला आहात ना? चला तर मग मी ही तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही.

http://www.yourwebsitevalue.com या वेबसाईटवर जा. तेथील  अ‍ॅड्रेस बॉक्समध्ये तुमच्या साईटची URL टाईप करा आणि Estimate Website Value या बटनावर क्लिक करा. दहा टप्प्यात तुमच्या साईटचे परीक्षण काही क्षणातच केले जाईल आणि पुढील काही क्षणातच तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर आहे ते डिटेल्ससह तुम्हाला या वेबसाईट वर झळकलेले दिसेल.

त्याचसोबत गुगल, फेसबुक, युट्युब, याहू यासारख्या टॉपटेन वेबसाईटच्या किंमतीची यादीही येथे पाहायला मिळेल. इतकेच नव्हे तर तुमची वेबसाईट जर तुम्हाला विकायची असेल तर त्यासाठीची नोंदणीही करण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे.

Original Post - http://nathtel.blogspot.com/2010/12/blog-post_15.html

Monday, December 6, 2010

"पीएम" ची लक्षणे

"पीएम" ची लक्षणे

सॉफ्टवेयर मधे काम करत असलेल्याना पीएम कसा असतो हे वेगले सांगायची गरज नाही आहे.
रामदासांनी सांगितलेल्या मुर्खांच्या लक्षणांशी या लिखाणाशी कोणताही संबंध नाही, तसे काही जाणवल्यास तो केवळ योगायोग समजावा, सुज्ञास जास्त सांगणे नलगे !
कळावे...आपल्या सारखाच एक "पिडित"

जयाला प्रत्येक गोष्टीची घाई
रोजच्या कामाचे स्टेटस पाही
विचारुन करी जो हैराण मानव.......................॥१॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

जो दर दिवशी मिटिंग घेई
तरी त्यास कसले समाधान नाही
फुका जयाला कामाची घाई............................॥२॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................ ॥ध्रु॥

जो बोलू लागता झोप येई
काही विचारता गाठे जांभई
जयाला पाहता मागे जातसे बाही.....................॥३॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

डोक्यावरी बैसोनी
कामाची घाई करोनी
नंतर चेंजेस सांगे फिरुनं
तरी जो न देई जास्तीचा वेळं
वाटे तयाला सगळाच खेळं.............................॥४॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥


जो कधीही न पडे आजारी
कामाचे तया असे वेड भारी
तयाचि (ची) इच्छा काम करावे शनिवारी.........॥५॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

मुक्त पाखरावर ठेओनि (ठेवोनी) लक्षं
अलोकेशनाने (अॅलोकेशन) करी तयाचे तो भक्षं
रहावे सदा तयासमोर दक्ष.............................॥६॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

सगळे काम संपता
जो होई कावरा बावारा
डीलीव्हरीच्या दिवशी
तयाचा होई
"बैजु बावरा"...............................................॥७॥
अशा पामराला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................ ॥ध्रु॥

समोर पी॓एम येता
आपल्याकडे पाहुनि (नी) हसता
सत्वर दक्ष व्हावे
देवास पुजावे मनोभावे...................................॥८॥
भेसुर हसणे हे सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

हसणे तयाचे असते ग्वाही
संकटे घेरणार दिशांनी दाही
देवाचि (ची) करुणा भाकावी
तयास नवसाची लालुच (लालूच) दाखवावी,.........॥९॥
अशा संकटाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

सर्वांसमोर जो करी कौतुकं
जणु ते शाब्दिक माणिक मौतिकं
सोनेरी दागिन्यांचे सत्वर
पडतसे उघडे पितळ......................................॥१०॥
अशा दागिन्यांना सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

ता.क. - ही कविता माझी नाही.

Thursday, November 18, 2010

'आम्ही कोण?' - (अजुन) एक विडंबन

'आम्ही कोण?' - (अजुन) एक विडंबन



केशवसुत आणि आचार्य अत्रे ह्यांची जाहिर क्षमा मागुन, "आम्ही कोण?" ह्या कवितेच्या विडंबनाचे विडंबन.

आम्ही कोण?
'आम्ही कोण?' म्हणुनी काय पुसता माउस टिचकावुनी ?
देखिले जणू नाही अमुचे प्रोफाईल अजुनी तुम्ही ?
लक्षोलक्ष व्हिजीटा झडती ज्या फेसबुकी, दिसले
त्या रद्दी-डेपोत न कसे तुम्हा अमुचे 'बुक' अजुनी?

ते आम्ही - धडाधड टाकू ब्लॉगान्चेही सडे
ते आम्ही - भरवून टाकू पिकासाही तोकडे
ओर्कुट-फोर्कुट कोठेही जा झेंडा अमुचा वसे
कोण्याही मराठ-फोरमी अमुची टिपणी दिसे!

रेषेवर आम्ही जणू, दिसे नभोमंडळी तारका
साईटही अमुची जणू गुगललोकीची द्वारका
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या*
इकडून-तिकडून लिंका ढापू, साईट सजवू पहा

आम्हाला वगळा - गतप्रभ किती होतील गुगल बझे
आम्हाला वगळा - 'ई-सकाळी' कमेंट कैसी पडे?

           - भालचंद्र पुजारी.
-----------------------------------------------------------
(*मूळच्या मूळ कवितेतून ढापिल!)
मूळ कविता 'केशवसुत', मूळ विडंबन 'आ. अत्रे'

ही कविता सर्फिंग करता करता एक ब्लॉग वर वाचली, आणी नेहमीच्या सवयी
प्रमाणे ब्लॉग वर पोस्ट करतोय. पण कविता छान आहे. 

Friday, October 29, 2010

मी गर्दीत वाट हुडकतोय.................

मी गर्दीत वाट हुडकतोय.................

रोज सकाळ होते, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो.
उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो, बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो,
लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो, आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.
शाळा झाली, सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................
१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.
अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.
अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................
लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो.
माझेही इंडक्षन झाले , काम झाले, कष्ट झाले , अप्रेज़ल झाले, मॅनेजर ला शिव्या देणे झाले, ३/४ स्विच झले, पॅकेज वाढले.
मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी मंदार दीपक बनसोड मधला "मंदया" होतो आता " Mady." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे.
एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३/४ तास गप्पा मारणारा मित्र नाही.
मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो.
घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो, २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला जाउ दे त्याला निवांत महणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो.
आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो, माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, माझी कार..सगळ्याना दाखवत बसतो. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, ....
मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल काका-काकी कुट तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही,
मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही,आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही.
लोकही माझे मेल/स्क्रॅप/ पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण; च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची, एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.
गर्दीत राहून पण मी आज एकटा आहेनावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही. पण तुम्ही सुधा दु:खी व्हाल, त्या वेळेला कलीग, डिलीवरेबल्स, मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे.... सॉरी... असे म्हणत कलटी टाकतील. सॉफ्टवेर वाला झाला म्हणून काय?? दु:ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही. प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं.
अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच, जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात.
मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो??सगळे करतात तेच बरोबर असेल , जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल, या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो.
काय असते ही गर्दी? इयत्ता १ ली ते ..इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी?? कोण ठरवतो यांची दिशा? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही......पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात..आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो.
आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत, कशासाठी ते कुणालाच माहीत नाही, मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का? मला पक्के मित्र मिळत नाहीत का? का मीच त्या वाटेला जात नाही. विचार करून डोके दुखु लागले , उपाय म्हणून कायतर मशीन ची हॉट कॉफी मारुन स्मॉकिंग झोन मधे कलीगला घेऊन चक्कर मारुन आलो.
पण आता ठरवले आहेकाही तरी केले पाहिजे, जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे, का मी जाउ शकत नाही? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का?? कोण मला अडवणार? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून, का नाही मला कोण अगदी जवळचा इतके सगळे कलीग असून?
बरेच काही हरवलय........बरेच काही गमावलय.............नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए........गर्दी कुठे तरी जाते म्हणून मी माझे स्वत:चे असे सगळे सोडून गर्दीतला दर्दि झालो..........गर्दी करते ते सगळे नियम पाळायला लागलोय.
कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे.
बसस्स.......आता ...ठरवले आहेआणि सुरुवातही केलेली आहे, कलीग म्हणतात हा आज काल वीकेंड ला येत नाही बरोबर, हा थोडा वेगळाच वाटतो आहे, लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला. आज काल म्हणे पुन्हा पेटी वाजवायला विठ्ठल मंदिरात जातो, ए हा असा का करतो? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे, अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा गणपती मंडळात ढोल वाजवायला जाणार आहे, हे हा खरेच असे करणार आहे?
मी थोडा वेगळा झालो आहे, गर्दीत आत्ता थोडी कुर्बुर आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे..........लोक वाट चुकलेला का म्हणेना मलापण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे.
एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काही स्क्वेफूट घेण्यासाठी धडपडत आहोत काय?? का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत:चे समाधान करत आहोत काय?
मला पुन्हा "Mady" नाव सोडून मंदया व्हायचे आहे........

हा लेख मी जरी लिहिला नसला तरी यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक सॉफ्टवेर इंजिनियर ला लागु होते. म्हणून इथे पोस्ट करत आहे...............

Sunday, October 24, 2010

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

काल सुटी असल्यामुळे रूम वर  "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय"  चित्रपट पुन्हा पहिला. त्यातील आवडलेली
काही वाक्ये पुन्हा सांगावेसे वाटतात...




कडे-कपाऱ्या दऱ्या-खोऱ्यातून,
निधड्या छातीने घोड्याच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या,
त्या शिवबाचे वारसदार असे हतबल होऊन
स्वत:च्या मराठीपणाची लख्तरं गुढी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्या वेशीवर टांगलीय.
याचसाठी केला का केला होता अट्टाहास, हिंदवी स्वराज्याचा?
मर्द मावळ्यांच्या राज्याचा?
आई भवानीचा आशिर्वाद आणि जिजाऊंचा लढावू बाणा घेऊन,
रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली,
ती हाच दिवस पाहण्यासाठी?
तुम्हाला मराठी असण्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी?



मराठी माणूस आज स्वत:च्या कर्तुत्वाने मागे राहिला आहे.
"आमची कुठेही शाखा नाही" असे अभिमानाने सांगता तुम्ही,
अहो त्या गोष्टीची लाज वाटायला हवी,
त्या अभिमानाची पाटी कसली लावता?
मराठी माणसाला मान नाही कारण हि स्थिती तुम्हीच स्वत:वर ओढवून घेतलीय.
स्वत:च्या नाकर्तेपणाचे दोष परप्रांतियांवर लादू नका.



जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्याचा सळसळता रक्त.
सर्व क्षेत्रांत मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित करा.
वेडात मराठे वीर दौडले सात..... आजच्या काळात त्या गाण्याचा बदल करायला हवा.
माझा लाखो, करोडो लोकांचा मुलुख आणि वेडात मराठे वीर दौडले फक्त सातच?
आता म्हणा वेडात मराठे वीर दौडले सात नाही एकसाथ..
आणि मग पुन्हा एकदा म्हणता येईल..
दिल्लीचा तख्त राखितो महाराष्ट्र माझा!

Google - music

Google - music

online music ऐकणार्‍यांसाठी खुषखबर ! तुम्ही आज पर्यंत रागा.कॉम किंवा धिंगाणा.कॉम वर गाणी ऐकत आला आहात .. पण आजच गूगल भारतने [ in.com, saavan.com अशा ] संस्थळांच्या संयुक्त प्रयत्नांनी चक्क online संगीत ऐकायची google.music सेवा सुरु केली आहे. धक्का बसला ना ! मला ही ...

नवीन प्रयोग आहे म्हणुन मी भेट दिली. मला वाटलं की क्रीएटिव्ह कॉमन्स किंवा जुनी गाणी असतील. जसं यु ट्यूब वर आहे. पण इथे तर चक्क नवप्रदर्शित दबंग, i hate love storys, ब्रेक के बाद तसेच लगान, गोलमाल३, दिल्ली ६ अशा प्रतिथयश चित्रपटांच संगीत इथे ऐकायला मिळत आहे व तेही फुकट! हां ! दर्जा अजुन इतका चांगला नक्कीच नाहीय ! पण अगदीच नसण्यापेक्षा काय वाईट आहे ?? या शिवाय तुम्ही तुमची आवडती गाणी फ़ेसबुक जीमेल बज्झ वर सुद्धा इतरांना पाठवू शकता. याहून अजुन काय पाहिजे??

समोर आलेल्या यादीतून हव्या त्या अल्बम वर टिचकी मारा किंवा शोध घ्या आणि समोर आलेल्या यादीतून गाणे सुरु करा. हेडफोन्स असतील तर मजा जास्त येते, कारण मोठ्या आवाजाला हा दर्जा इतकासा चांगला नाहीय.. शिवाय गाणे दुसर्‍या विंडोत सुरु होत असल्याने तुमच सर्फिंग सुद्धा थांबत नाही! पण एक उणीव म्हणजे यादी करुन गाणी लावून ठेवता येत नाहीत.
 इथे जुने व नवे चित्रपट आहेतच पण सर्व माहिती अगदी व्यवस्थित वेगवेगळी वर्गिकरण केलेली मिळते. तसेच दिलेली माहिती खरी असावी असेही वाटत आहे.



{ता. क. : इथे सर्वच भाषांची गाणी आहेत हो !! मराठी मध्ये अगदी लोकल अल्बम्स ते नवे अल्बम्स ही..  ते ही गूगल सजेशन्स च्या माध्यमातून ... :) मान गये गूगल !! }
समजा सलमान खान च्या नावावर टिचकी तुम्ही मारलीत तर त्याचे सर्व असलेले चित्रपट इथे तुम्हाला दिसु लागतील. अशाच प्रकारे ए. आर. रेह्मान च्या नावावर  टिचकी मारल्यावर ६६५ शोध मिळाले आहेत. दिलिप कुमार, राज कपूर यांच्या काळातील गाणी पण उपलब्ध आहेत. फक्त आता हवे आहेत श्रोते !! तुम्ही लगेच क्लिक करुन जर सुरु केलं असेल तर ही पोस्ट इथ पर्यंत वाचत असताना एखादे गाणे संपत ही आले असेल ..


आता गूगल अजुन काय वेगळ करणार? या प्रश्नाला बहुतेक उत्तर भेटल असाव....
;)

Monday, October 18, 2010

भाग आठ - 'कॉलेज डेज'ला निरोप (तो आणि ती)

भाग आठ - 'कॉलेज डेज'ला निरोप (तो आणि ती)


ग्रुपमध्ये आता साडेतीन कपल्स होते. मिथिला-नचिकेत, आशय-ऋतूजा, प्रिन्सेस आणि कुणीतरी ज्युनिअर (तात्पुरता), तर पप्प्या अजून काहीसा तळ्यात-मळ्यात होता. कॉलेजचे सोनेरी दिवस सरत आले. फेअवरव्हेलचा पाहुणचारही हादडून झाला. कॉलेजची आणि नंतर विद्यापीठाची खडतर परीक्षा आटोपली. पेपर चांगले गेले. गेले म्हणजे नाक दाबून गळ्यात कडवट औषध ढकलल्याप्रमाणे गेले. म्हणून रिझल्टची धाकधूक लागली होती. शेवटी चांगले गुण पडले. कंपनीतील प्रवेशाची चाहूल लागली. एक नव्या जगात प्रवेश झाला. बघुया काय झाले ते... 

कॉलेजचा फेअरव्हेल दणकून झाला. ग्रुपमधले दोन सदस्य - जे अगदी भावनात्मकरीत्या कोरडे होते - ते प्रेमात पडले. पडले म्हणा किंवा धडपडले. दोन्ही सारखेच. प्रिन्सेस एका ज्युनिअरच्या गळ्यात अडकली, तर नुकत्याच नोकरीवर लागलेल्या एका लेक्‍चररने पप्प्याची दांडी गुल केली होती. तसे बघितले, तर दोघांची प्रकरणे अगदी जगावेगळी. ती फार काळ टिकेल, असे वाटत नव्हते. प्रिन्सेसचा तसाही बॉयफ्रेन्ड बदलण्यात रेकॉर्ड होता. आणि मित्रांची तर गणतीच नव्हती. पप्प्या तेवढा प्रामाणिक होता. तो कधी कुण्या मुलीशी बोलणार नाही. कधी कुणाशी मैत्री करणार नाही. मुलींना बघायला मात्र त्याला आवडायचे. तेवढाच काय तो नाद! तोही लेक्‍चररच्या प्रेमात पुरता अडकला. पण लेक्‍चररने अजून हिरवा सिग्नल फडकावला नसल्याने पप्प्याचे स्टेट्‌स काहीसे "वर्क इन प्रोग्रेस' असेच होते. ते आणखी कित्येक दिवस तसेच राहील, यावर ग्रुपचा दृढविश्‍वास होता. कारण पप्प्यात एखादी मुलगी पटविण्याची क्षमताच नव्हती. ग्रुपमधील इतरांनी त्याला ट्रेन करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्याच अंगलट यायला लागला. त्यानंतर त्याला कुणी काही सांगण्याची जोखीम पत्करली नाही. उलट त्याचे जे काही सुरू आहे, त्याचे खोटे खोटे कौतुक करून आपली सुटका करून घेण्यात तरबेज झाले.

दिवसांमागून दिवस जात होते. कॉलेजच्या परीक्षा सुरू झाल्या. त्याला केवळ "उपस्थिती' अनिवार्य होती. युनिव्हर्सिटी परीक्षेच्या सरावासाठी त्या महत्त्वाच्या ठरल्या. केलेल्या अभ्यासाची उजळणी झाली. आणि पडताळणीही. त्यानंतर युनिव्हर्सिटी परीक्षा सुरू झाल्या. अभ्यासाचे अगदी काटेकोर नियोजन करावे लागले. अभ्यासूवृत्तीचा कस लागला. जीवनातले दोन आठवडे कसे गेले ते समजले नाही. सगळ्यांची अगदी "दयनीय अवस्था' झाली होती. मुलांची जीम सुटली, तर मुलींच्या पार्लरच्या फेऱ्या कमी झाल्या. पार्लरच्या फेऱ्या थांबतील, असे वाटले होते. पण स्त्री-स्वभावावर औषध नाही! एकदाची परीक्षा आटोपली. मनावरचे मणामणाचे ओझे उतरले. आयुष्यात पुन्हा उत्साह संचारला. रुटीनची पुरती वाट लागली. जीम आणि पार्लर तेवढे नित्यनियमाने सुरू झाले. आता निकालाची प्रतीक्षा होती. पण त्याची चिंता होती कुणाला. परीक्षा संपल्याचा आनंद त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त होता. निकालाची वेळ येईल, तेव्हा बघूया काय होतंय ते, असा दृष्टिकोन त्यांनी जोपासला होता.

पण एक दिवस निकालाची तारीख जाहीर झाली. आनंदाने काठोकाठ भरलेल्या दिवसांवर रॉकेल पडलं. निकालाचा दिवस जसा जसा जवळ येत गेला, तसा तसा पोटात भीतीचा गोळा उठायला लागला. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सेंटीमीटर सेंटिमीटरने वाढत होत्या. मनावर कसंलसं दडपण घेऊन सगळे वावरत होते. शब्दा शब्दात निकालाचा उल्लेख वाढत गेला. निकालाच्या आदल्या दिवशी विश्‍वास पुरता डळमळीत झाला. आपले पेपर चांगले गेलेच नव्हते, असा साक्षात्कार व्हायला लागला. भयावह स्वप्नांची मांदियाळी झाली. कमी टक्केवारीची मार्कशीट डोळ्यांसमोर झळकायला लागली. पप्प्याला तर निकालावर "फेल' हे अक्षर आदल्या दिवशीच सकाळी सकाळी स्वप्नात दिसले. त्यामुळे तो बिचारा पुरता घाबरलेला होता. बावरलेला होता. त्याला इतर धीर देत होते. जे आधीच निकालाच्या दडपणात आकंठ बुडाले होते.

शेवटी निकालाचा दिवस उजाडला. हा दिवस पराकोटीचं दडपण घेऊन आला. घरातील इतर सदस्यांसाठी तो दिवस सर्वसाधारण दिवसांप्रमाणेच असला, तरी त्यांच्यासाठी एक "कत्लकी रात' जाऊन "कत्लका दिन' सुरू झाला होता. कशातच लक्ष लागत नव्हते. काय करावे, तेही समजत नव्हते. घड्याळाचा काटा पुढे सरकत गेला. दुपार झाली. निकालाची घोषणा झाली. तसे सगळे चुरगळलेल्या कपड्यांनी, चेहऱ्यावर वितभर लांबीच्या सुरकुत्या मिरवत आणि मनावर भलेमोठे दडपण नाचवत निकालाला सामोरे गेले. निकाल बघितल्यावर गोऱ्या गालांवर सुरकुत्यांच्या जागी गुलाबी छटा उमटल्या. आश्‍चर्याने ओठ वाकडे झाले. त्यानंतर पर्सच्या छोटाशा आरशात बघून "शॉर्ट बट स्वीट' मेकअप चढविण्यात आला. मुलांनी उजव्या हाताच्या मुळी वळल्या. जोरजोरात शिट्या शिलगावल्या. सर्वत्र आनंद पसरला. आपण उगाच जुने कपडे चढवून निकाल बघायला आलो, असेही काहींच्या मनात येऊन गेले.

निकाल बघितल्यावर त्यांचा ग्रुप कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जमला. कदाचित कॅन्टीनमध्ये एकत्र येण्याची ही अंतिम वेळ असावी. ती तेव्हा कुणाच्याच किंचितही लक्षात आली नाही. चायनीज आणि कडवट कॉफीची ऑर्डर सोडण्यात आली.

""काही म्हणा यार, चांगले मार्कस मिळाल्याने जिवात जीव आला. अगदी हायसे वाटले. आपले पेपर कसले कठीण गेले होते. सगळ्यांचा पोटात भीतीचा गोळा उठला होता. वाटत होते, आता चांगले मार्कस पण मिळणार नाही. आणि हाती आलेली नोकरीही. सगळे हातून निसटून गेले आहे. पण खरंच छान मार्कस पडले. मी अपेक्षाही केली नव्हती. ज्याने कुणी माझा पेपर तपासला असेल, त्याला सॅलरी हाईक मिळो-बढती मिळो, अशी देवाचरणी प्रार्थना,'' आशय उत्साहात बोलत होता. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

""चांगले मार्कस मिळाले, तर याला आज देव आठवला. आहे की नाही कलंदर! कॉलेज सुरू असताना कधी गेला होता का मंदिरात? आज सकाळी कधी नव्हे ते मंदिरात जाऊन आला आणि आता दिवसभर मारे देव देव करतोय. असो! पण खरंच ज्याने कुणी पेपर तपासला असेल, त्याला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. एखादा चांगल्या स्वभावाचा माणूस असेल तो. त्याने अगदी सढळ हाताने मार्कस दिलेत,'' मिथिलाने आशयला उडवून लावला.

""अरे मी मगापासून बघतोय, तुम्ही पेपर तपासणाऱ्याची यथेच्छ स्तुती करताय. आपल्या सर्वांचे पेपर एकाच व्यक्तीने तपासले असतील काय? तुम्ही पण ना राव, ग्रेटच आहात. डोक्‍याचा थोडा तरी वापर करा. आता काही दिवसांनी तुम्ही कार्पोरेट जगात वावरणार आहात. आणि हे असले विचार. कुणी काही म्हणेल, याची जराही चिंता नाही,'' नचिकेत उगाच समजूतदारपणाचा आव आणत होता. पण येथे त्याचाही बाप बसला होता.

""एक नाही तर हजार माणसं असतील, पेपर चेक करणारे. त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा. त्याच्याशी आपला काय संबंध. आपण आपल्यापरीनं त्यांचे आभार मानले तेवढंच समाधान... मला तर बाबा आता मी कधी एकदाचा कंपनीत दाखल होतो आणि कधी नाही असं झालंय. मी कंपनीचं ऑफिस पाहिलंय. कसलं चकाचक आहे ते. अगदी अमेरिकेत गेल्यासारखं वाटत होतं. आणि कसल्या त्या चिकण्या...,'' पप्प्याने दीडशेच्या स्पिडने पळणाऱ्या जिभेला करकचून हॅन्डब्रेक लावला. तरीही इतरांना जे समाजायचं ते समजलं. पप्प्याच्या स्वभावाचा सर्वांना सराव झाला होता.

अविट विषयांवर चर्चेचे मोहोळ उठले. प्रत्येकजण आनंदात असल्याने उत्साहाने सहभागी होत होता. येत्या आठवड्यात ऑफर लेटर घेऊन त्यांना कंपनीत दाखल व्हायचे होते. कायमचे कॉलेज लाइफ संपविण्यासाठी. एका नवीन जगात प्रवेश करण्यासाठी.
(क्रमशः)





- विजय लाड

Saturday, October 16, 2010

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.......

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.......


झेंडूची फुलं केशरी केशरी, 
वळणावळणाच तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी, 
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृत्कृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमी ची रीतच न्यारी....||
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा........

ही विजयादशमी आपणासाठी सुख समृधि आणी शांतता घेउन येवो.
- मंदार दीपक बनसोड

माझा राजा शिवाजी

माझा राजा शिवाजी


परवा परवा मुंबईमध्ये हिंदु- मुसलमानांची दंगल झाली, का झाली, कशासाठी झाली, कारणं परंपरा हा भाग वेगळा,... पण त्या दंगलीचा फायदा उठ्वून, एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काहि गुंड होते आणि त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एन पंचविशितली एक लावण्यखणी युवती होती. देखणी,.... आरसपणी.. बस बघावं आणि बघतच रहावं इतकी लावण्यखणी, या गुंडांचा तिच्यावर डोळा होता, दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठ्वावा आणि त्या युवतीची आब्रु लुटावी......असा बेत त्यांनी आखला आणि दंगल एन जोमात असतानाच ,रात्रिच्या बारा साडे बारा वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले..........

बघता बघता दरवाजावर धड्का पडू लागल्या , आतली ती बावरली..... शहारली........घाबरली,

खिडकितुन बघितलं.... गुंड दिसले... इरादा ध्यानी आला तसे जिवाच्या आकांताने धावत सुटली.

मुंबईच्या रस्त्यावरुन रात्रिच्या बारा साडे बारा वाजता बेभानपणे पळतेय. गुंड पाठलागावर आहेत, तिला कळून चुकलं....या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या आब्रुची लक्तरे ईथे रस्त्यावरच टांगली जातील,म्हणून बेभान पळतेय जिवाच्या आकांताने काळोख चिरत धावतेय.....धावता....धावता एका बोळात

शिरली बोळातल्या एका घरात तीला उजेड दिसला धपापत्या उरानं दारापुढं आली.... दार ठोठावलं दार उघडलं गेलं.....दारात उभा होता एक एन तिशीतला एक हिंदु युवक.........

दारात मुसलमानी पाहीली त्याला आश्चर्य वाटले. बाहेर दंगल चाललीय हिंदु- मुसलमानांची हि मुलगी मुसलमान मग या हिंदुच्या दारापुढं कशी?.....

त्याने विचारले "काय हवयं?"

ती युवती म्हणाली " काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत, एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का? माझी आब्रु लुटायचा बेत आहे त्यांचा."

हा युवक म्हटला "निश्चिंत आत ये घर तुझच आहे" तिला आत घेतलं, स्वतःच अंथरुण्-पांघरुन दिलं आणि सांगितलं "शांत झोप इथ तुला कसलीही भिती नाहि, मी स्वता: दाराशी राखण करीत राहतो रात्रभर.. ते गुंड परत येणार नाहित तुला त्रास दयायला."

ती युवती युवती झोपी गेली, हा दाराशी राखण करीत बसला, पण राखण करता करता डोक्यात विचार आला.... बाहेर दंगल चाललीय हिंदु- मुसलमानांची हि मुलगी मुसलमान मी हिंदु मग या हिंदुच्या घरात तिने आसरा मगितलाच कसा?.....तिला भिती नाही का वाटली?..... आणि ते गुंड तिची आब्रु लुटाण्यासाठी तिच्या मागावर आहेत..... मि ही घरात एकटाच आहे, मी हि तरुण आहे,

मनात आणलं तर ...आता... याक्षणी....इथच... या युवतीची आब्रु मि लुटु शकतो, हिला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नाही......मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात निश्चिंत पणे थांबलीय?

रात्रभर विचार केला उत्तर मिळलं नाहि..... सकाळ झाली ति युवती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले.........पण न रहावून याने विचारले

"बाहेर दंगल चाललीय हिंदु- मुसलमानांची तू मुसलमान मी हिंदु मग माझ्या घरात आसरा कसा मगितलास ? ते गुंड तूझी आब्रु लुटाण्यासाठी तूझ्या मागावर होते...पण मि ही घरात एकटाच होतो........ मी हि तरुण होतो...........मनात आणलं तर रातोरात तुझी आब्रु मि लुटु शकलो आसतो........तूला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नव्हतं ......मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात थांबलीस?

त्यावर ती युवती म्हणाली "त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी बेभानपणे धावत होती. मुंबईच्या रस्त्यावरुन सैरावैरा पळत होते.......धावता....धावता या बोळात शिरली बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला धपापत्या उरानं मी दारापुढं आले.... पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मि आत डोकावुन पाहिलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला.......छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला.........आणि मगच मी दार ठोठावलं................

कारण मला माहिती आहे,... ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आब्रुला धोका नाही.....



पाहिलतं गेल्या साडे तिनशे वर्षा नंतरही माझ्या शिवाजी राजा बद्द्ल जनमाणसांमध्ये जी प्रतिमा आहे...ती हिच प्रतिमा आहे

शिवाजी राजे स्मरणात आहेत ते फक्त एव्हढ्यासाठी..........

--
ही ऑडियो क्लिप मी एक मित्राच्या मोबाइल वर ऐकली होती. 
हे लिहिल कोणी आहे हे तर मला माहिती नाही पण ज्याने ही लिहिल तो खरच खरा मराठी आहे...............


जय भवानी जय शिवाजी



Friday, October 15, 2010

पुन्हा मिळतील का ते दिवस?

पुन्हा मिळतील का ते दिवस?

ती सतरा वर्षे. कदाचित जीवनातील सर्वात अविस्मरणीय वर्षे... वडिलांचे
रागावून पाहणे... मग कुठल्यातरी गोष्टीसाठी आईकडून त्यांच्याकडे शिफारस
करणे, लहानसहान गोष्टींवर रागावून न जेवणं... शाळेतली आवडलेली पहिली
मुलगी, ते गुपित माहित असणारे शाळेतले मित्र... रोज अभ्यासाचे वेळापत्रक
बनवणे आणि ते मोडणं... अगदी मित्रांना शपथ घेऊन वचन देणे, मग ती दिलेली
वचने विसरुन जाणे... परीक्षेच्या आधी रात्रभर केलेली
जागरणं... शेजारच्या उत्तरपत्रिकेत डोकावणं... वर्गात नेहमी तिच्याकडेच
पाहत राहणं... शिक्षकांना नावं ठेवणं... हेडसरांनाही न घाबरणं...
छोट्याछोट्या गोष्टींवरुन ’अ’ तुकडीतल्या पोरांशी पंगा घेणं, ’ड’
तुकडीतल्या पोरांकडं तुच्छतेने पाहणं... पीटीच्या खडूस मास्तरला घाबरणं...शेजारच्या काकूंच्या घरी जाऊन बिनधास्त चरणं, मग घरी येऊन आईची बोलणी
खाणं. सहलीसाठी पैसे भरायचे म्हणून स्वतःच घरी येऊन बाईंनी पाठवलं म्हणून
खोटंच सांगणं, घरी जाताना एक डबडं लाथेने उडवत उडवत घरापर्यंत घेऊन जाणं,
मित्रांशी खिसाबुक्की आणि स्टॅच्यू खेळणं... कधीतरी वडिलांच्या ऑफिसमध्ये
जाऊन दुसर्‍या दिवशी उगाच मित्रांच्यात भाव खाणं...यल करुन लावण्यापेक्षा पुशबटनचा फोन असलेल्या लांबवरच्या एसटीडी बूथवर
जाणं, दहावीचा निकाल लागल्यावर बक्षीस मिळालेली पहिली शंभराची नोट,
अकरावीला कॉलेजला गेल्यावर इमारतीकडे वर पाहत पाहत एका टग्या पोराला
धडकणं, पहिल्यांदाच लेक्चर बंक मारणं, पहिला घरी न सांगता पाहिलेला
पिच्चर, कॉलेजजवळच्या स्वीटहोममध्ये जाऊन सामोसे खाऊन सेलिब्रेट केलेला
बर्थडे, डिसेक्शन बॉक्समधल्या चाकूने कापलेला केक... बुटाला लागलेली धूळ
एक पाय वर घेऊन पोटरीवर पॅंटला पुसणं, घातलेली पहिलीच जीन्स आणि शूज...
उसन्या आणलेल्या कॅमेरासमोर उगाच एक पाय पुढे करुन ऐटीत दिलेली पोज, मग
कित्येक दिवस तोच फोटो निरखून बघणं, ओठ ओले करुन मिशी दिसतेय का ते आरशात
पाहणं, लॅमिनेट केलेल्या आयकार्डवर फोटोला स्केचपेनाने मिशी काढून पाहणं...सगळं कसं अगदी काल झाल्यासारखं आठवतंय... पुन्हा मिळतील का ते दिवस?

देवबाप्पा सचिन निवृत्तीनंतर (कल्पनाही करवत नाही !)

 देवबाप्पा सचिन निवृत्तीनंतर (कल्पनाही करवत नाही !)






काही वर्षांपूर्वी (जास्त दूर जायची गरज नाही, ३-४ च झाली असतील) ,नेमेची यायचा क्रिकेट सिझन आणि नेमेची चर्चा व्हायची देवबाप्पाच्या निवृत्तीची. "शेर अब बुढ़ा हो गया हैं !" थोबाडीत मारलीये सचिनने त्यांच्या. 

आता बघा ना २००६ ला एक बोका सचिनच्या जखमांवर मीठ चोळत थोबाडीत मारलीये सचिनने त्यांच्या. आता बघा ना २००६ ला एक बोका सचिनच्या जखमांवर मीठ चोळत होता. आता मात्र कसे त्याचे दात त्याच्या घशात गेलेत. जखमांनी त्रासलेल्या सचिनला मानसिक आधार देण्याऐवजी हा 'सिक' बोका " मेरी बिल्ली मुझीसे म्याऊ" म्हण सार्थ करत होता. अरे, तुझ्या अवेळी संपलेल्या कारकिर्दीचे खापर सचिनच्या हेल्मेटवर कशाला फोडतोस ? त्याने तेव्हाच हेल शी आपली meeting निश्चित केली! मग २००७ ला सचिनवर ऑस्ट्रेलियातून एक चप्पल भिरकावली गेली, "सचिनने आता निवृत्त व्हावे. तो आपल्याच खेळाची सावली बनलाय आता." त्याच्या भावाने पण त्याच्या चपलेवर चप्पल ठेवत देवबाप्पाच्या प्रामाणिकतेवरच शंका घेतली.अरे, तू कोचिंग करायचे पैसे घेतले होतेस कि टीम फोडण्याचे? न्यूझीलंड विरुद्ध ८०-८१ मध्ये आपल्या भावाला underarm टाकायला लावून खिलाडूवृत्तीचे मस्त दर्शन घडवले होतेस !! किती म्हणून उदाहरणे द्यायचीत ? सगळे बघा आता कसे गप्प झालेत !! थोबाडीत मारलीये सचिनने त्यांच्या.
मी सचिनचा  नेहमीच डाय हार्ड पंखा राहिलोय ,ते फक्त त्याच्या खेळामुळे नव्हे तर  त्याच्या स्वभावामुळे. आदर्श खेळाडू , नव्हे आदर्श माणूस कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे सचिन. प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना आणि सारी दुनिया  तुमच्यावर टीका करते तेव्हादेखील कसे वागावे याचे आदर्श म्हणजे सचिन.  ज्याने त्याच्यावर टीकेचा बाउन्सर फेकला तो सहज मैदानात टोलवत त्याच्या  घशात टाकणारा खेळाडू सचिन ,मैदानाबाहेर एक शब्दही बोलणार नाही . सगळे उत्तर बॅटने देणारा सचिन, कदाचित म्हणूनच तो १० वी ला नापास झाला असणार ! 

सचिनच्या या बॅटने उत्तर द्यायच्या सवयीमुळे तो  अनेकांचे सोपा लक्ष्य राहिलाय. कुणीही यावे आणि टपली मारून जावे असा काही  प्रकार वरचेवर सचिनसोबत घडत असतो. एक पत्रकार खेळीया (हा शब्द त्या  पत्रकाराचाच शोध बरे का ? आणि तो पठ्ठा स्वतःचा खेळीया आहे !) सचिनवर  आपल्या "मुखाद्वारे मलनिस्सारण " करण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या डोक्यात भिनलेल्या मलकेमिस्ट्रीचे रासायनिक पृथःकरण कागदावर मांडतो. त्याला माहित असते सचिनवर टीका म्हणजे आपली फुकट प्रसिद्धी.. अरे पण सूर्यावर थुंकशील तर तुझाच चेहरा घाण होईल रे! सचिनसारखा प्रसिद्ध होऊ शकणार नाहीस तर किमान त्याचासारखा माणूस बनण्याचा प्रयत्न तरी कर !

एकेकाळी भारतीय क्रिकेट संघ म्हणजे 
"सचिन + नियम आहे म्हणून ठेवलेले इतर  १० खेळाडू" असा होता. 
सचिनच तेवढा खेळायचा, बाकी सारे हजेरी लावून परतायचे, आणि हे म्हणायचे सचिन सामना जिंकवू शकत नाही !! त्याच्यामुळेच तर तुम्ही ते थोडे सामने जिंकले होते रे !! 
पुढे सौरभ आला, राहुल आला सेहवाग आला, सचिनच्या डोक्यावरचे ओझे किंचीत कमी झाले. 
कित्येकांचा आवडता खेळाडू बदलत राहिला, त्यांच्या प्रवास सचिन ते सेहवाग व्हाया गांगुली असा होता.

पण माझ्या मनात सचिनच देवबाप्पा राहिला.

सचिनच्या पडत्या काळात त्याला धीर देण्याऐवजी त्याचे मनोबल खच्ची करणारी जमात  पाहिली, मुंबईच्या सामन्यात त्याला घराचा आहेर दिला यांनी . माय-बाप म्हातारे झाले म्हणून वृद्धाश्रमात ठेवणारे याच जमातीचे..

"जो तो वंदन करी उगवत्या" या म्हणीची प्रकर्षाने जाणीव सचिनच्या त्या दिवसांमध्ये झाली .

सचिन रमेश तेंडूलकर - क्रिकेटचा देव !!
तो आहे तोपर्यंतच जिंकण्याची संधी  आहे हे जाणून असलेला सबंध भारतवर्ष आणि तो बाद होऊ नये जलसमाधी घेतलेले ३३  कोटी देव ! अशी जादू याआधी कोणत्या खेळाडूने केली होती ? तो बाद होऊ नये  म्हणून केले जाणारे अंधश्रद्धा प्रकारात मोडले जाणारे उपाय!! 
सचिन शतकाच्या उंबरठ्यावर आला की मी त्याला जाम शिव्या घालतो, "हा काय खेळणार आता ! हा सेंचुरी मारूच शकणार नाही बघ! नाही मारत रे तू आता सेन्चुरी सचिन!!केलीस तर मानेन बुवा तुला!!" असे काही म्हटले की सचिनला चेव येतो आणि तो सेन्चुरी करून दाखवतो असे मला वाटते. सचिनच्या शतकांच्या अविश्वसनीय  संख्येचे कारण माझ्या या शिव्या आहेत असे माझे ठाम मत आहे. प्रत्येक सचिनभक्ताचे असे काही उपाय असतीलच, जर नसतील तर मला तुमच्या भक्तीवरच शंका आहे.

         आता शेवटच्या उंबरठ्यावर तर सचिनची खेळी कैच्याकै बहरली  आहे. पिकलेल्या फळासारखं आहे तो , अवीट गोडीचा. त्याची खेळी बघतांना अंगावर  शहारे येतात. एक वेगळाच आनंद असतो मनात, सगळे दुःख ,सगळ्या चिंता कुठेतरी  उडालेल्या असतात . मी तर सचिन खेळत आहे तोपर्यंतच क्रिकेट बघणार.(हा बराच  जुना संकल्प आता अधिकच दृढ झालाय .)  सचिनविना क्रिकेटची कल्पनाही करवत  नाही.  gentleman's game मधला सचिन हा अखेरचा gentleman आहे . तो आहे खराखुरा "BAT" MAN !! पण सचिनही कधीतरी निवृत्त होणारच!! तो कधीच होऊ नये यासाठी मी देवाला अनंतकाळ जलसमाधी घ्यायला लावली तरीही !! पुढचे वर्ष  त्याचे कदाचित अखेरचे असेल

सचिन निवृत्तीनंतर काय करावे ??
1. IPL :- सुदैवाने या बहाण्याने त्याला खेळताना बघता येईल .
2. कोच :- सचिन म्हणजे क्रिकेटचे विद्यापीठ, तेही सर्वोत्कृष्ट !! क्रिकेटचे हार्वर्ड , MIT , CAMBRIDGE , IIT ,IIM , जे अव्वल ते सचिन !! सर्वाधिक पिचेसवर खेळायचा अनुभव आहे त्याला. प्रत्येक मैदानाची वैशिष्ट्ये त्याला तोंडपाठ असतील. तो जर कोच झाला तर कदाचित त्याच्या प्रचंड अनुभवाचा फायदा टीमला होईल.
3. सचिन तेंडूलकर क्रिकेट अकादमी :- व्वा व्वा !! प्रत्यक्ष सचिन बॅटिंग शिकवतोय म्हटल्यावर और क्या चाहिये !! त्याच्या अनुभवाचा फायदा सध्याच्या संघात असलेल्या बच्च्यांना होत असल्याची कबुली ते स्वतःच देतात. आणि सचिन बॅटिंग शिकवतोय म्हटल्यावर तर रांगच लागेल हो !! आमच्यासारखे सचिनभोवती फिरणारे पंखे तर वाटेल ती किंमत मोजायला तयार होतील !!
4. समालोचक : - मजा नाही नाही ..
5. आत्मचरित्र:- निवृत्तीनंतर सचिनने कदाचित आत्मचरित्र लिहिले तर ते हातोहात खपेल, विक्रीचे सगळे विक्रम मोडेल .
6. क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद वगैरे :- छे छे !! सचिनने या घाणेरड्या राजकारणात पडूच नये .

निवृत्तीनंतर सचिन एका Legend चे आयुष्य जगणार. माझी पिढी , जी सचिनला खेळतांना पाहत लहानाची मोठी झालीय ती आपल्या नातवंडांना सचिनच्या कथा , त्याच्या खेळ्या bed time story म्हणून , आजोबांच्या गोष्टी म्हणून ऐकवणार ..दंतकथा बनलेला सचिन आम्ही प्रत्यक्ष खेळतांना बघितलाय हे सांगतांना गळणारे दोन थेंब त्यांच्या नकळत पापण्याआड लपवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्या रेकॉर्ड करून साठवलेल्या खेळ्यांची पारायणे केली जातील. महागाई, आतंकवाद , भ्रष्टाचार, पगार , रोज झोपेचे खोबरे करणाऱ्या चिंता यांचा विसर पाडायला लावणारी खेळी, अवघ्या भारताला एका सूत्रात बांधण्याची ताकद असणारी खेळी, करोडो भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची ताकद असलेली खेळी आणि ही खेळी अगदी सहजतेने, क्रिकेटच्या मुलभूत नियमांनी खेळता येते हे दाखवणारा .

सचिन रमेश तेंडूलकर !!! 
तो फक्त एक gladiator आहे ??? 
छे छे !! तो ह्याहून बरेच अधिक आहे !!!
तो क्रिकेटचा शेवटचा सभ्य खेळाडू आहे !! 
He is The Last Gentleman of क्रिकेट (फक्त राहुल द्रविड अन अनिल कुंबळे सोडून...)

निवृत्तीनंतरचा सचिन अजून लिहवत नाहीये माझ्या हातून !! सचिन निवृत्त होऊ  नये हीच माझ्या देवांकडे प्रार्थना !!

जाता जाता :- 
जगात दोनच प्रकारची माणसे असतात
१ . ज्यांना सचिन आवडतो. 
२. ज्यांना बरे-वाईट माणूस पारखण्याची बुद्धी नाही.

तुम्ही कोणत्या प्रकारात आहात.....?

व. पु. प्रेमींसाठी...विशेषत: वपुर्झा

व. पु. प्रेमींसाठी...विशेषत: वपुर्झा

भक्तीभाव...असामान्य असं काही नसतं. ज्याला जसं परवडेल तसा तो राहतो. 
पूजेसाठी कुणी फुलं घेतो, कुणी सुवर्ण घेतो. 
स्वत:च्या कुवतीप्रमाणे जो तो साधनं निवडतो.
ती गौण नसतातच . ती नाममात्र असतात. 
प्रश्न असतो भक्तीभावाचा! शंभर वर्ष तप करून शंकराला एकेक शीर
अर्पण करणारा लंकाधिपती असतो, 
तर तुळशीच्या पाणावर दैवताला जिंकणारेही असतात

सौंदर्य...
'स्त्री? ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
'तुला बुद्धी हवी का सौंदर्य??
तेंव्हा ती स्त्री म्हणाली,
'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे!?
'का??
'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, 
पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.? 

ज्योत...
?ज्योत? म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं.
सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. 
कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून? 
आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, 
झंझावातालाही असतं. 

स्वाभाविक....
त्यांनी बघावं म्हणून मी इथं येत नाही. इट् इज अ पार्ट ऑफ द् गेम! पुरूष पाहणारच.
स्वाभाविक गोष्टींवर् चिड्ण्यात अर्थच नसतो. 
भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, अणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करत नाही. 
फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारानी, रसिकांनी कमळाकडे पहावं, भुंग्याकडे पहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं. 

जबाबदारी...
?जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल??
"ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा
दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी.."
"प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया. 
त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली."

"ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"

"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते. 
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं." 

पार्टनर
पोरगी म्हणजे झुळुक! अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही.

आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणुस न जाणं हाच नरक.

तुला मी हाक कशी मारु? पार्टनर ह्याच नावाने.
आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.

लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणुन मला तू हवा आहेस.

कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.

दु:खं, आनंद, जय, पराजय, हसु, आसु, जन्म, मरण, विरह-मिलन, सगळं तसच असतं .प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं, एवढच काय ते नविन. पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हेच मरण.

समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही.
आकाशाची व्याप्ती गरुडाला समजत नाही.
सुगंधाचं कोडं फ़ुलाला उमलत नाही.
एवढासा तू, त्याहुन एवढासा मी मला जिवनाचा अर्थ कसला विचारतोस?आणी त्याहीपेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो, हे तुला कोणी सांगितले?
पाणी म्हणजे एच टू ओ.इथचं सगळे थांबलेले आहेत.मुर्ख म्हणुन नव्हे तर जाणकार म्हणुन थांबले.
पृथ:करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही हे त्यांना समजलं म्हणुन.
कोणता आनंद क्षणजीवी नाही?
दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव. खाली उतरला की घास.
सुगंधाचं नातं नाकाशी.घशातुन आत गेल्यावर ति फ़क्त हवा.
खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसुन तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसीकता संपली.
इतर अनेक गरजांप्रमाणे "तृप्ती" जी एक गरज आहे.
जो गरजु आहे त्याला व्यवहार सांभाळावा लागतो.व्यवहार नेहमी साधतोच असं नाही.तो सत्यासारखा कटू असतो.
ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटूता निर्माण होते.
सध्या एकच वर्तमान्काळ सांभाळ. 

निर्णय घेता न येन ह्यासरखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेता येण्या पेक्षा चुकीचा निर्णय घेणे अधिक बरे. चुकीचा निर्णय घेनारया मानासनी जीवनात यश मिलावलेले आहें. परन्तु जो निर्णय घेवु शकत नाही त्याचे मन हे करू की ते करू ह्या गोंधलात घुन्तलेले असते. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी ज़ल्याचे ऐकिवीत नाही. त्याला कृति करता येत नाही आणि ज्याला कृति करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिलवता येत नाही. 
-व पु 

चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात. 

एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'सूर्य वरवर येऊ लागला.सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'

व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'.