Pages

Friday, October 15, 2010

दिवस भरात वेगवेगळ्या वेळी म्हणावयाचे श्लोक !

दिवस भरात वेगवेगळ्या वेळी म्हणावयाचे श्लोक !..




सकाळी उठल्यावर अंथरुणातच पृथ्वीला वंदन.....

कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती |
कर मुले तू गोविंदा , प्रभाते कर दर्शनम ||

प्रभाते मनी राम चिंतीत जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा |
सदाचार हा थोर सोडून येतो, जनी तोचीतो मानवी धन्य होतो ||

जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे |
मना त्वाचीरे पूर्ण संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले ||

मना मानसी दुख: आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे |
विवेक बुद्धी ही सोडोनी द्यावी, विवे देही पणा मुक्त भोगीत जावी ||
जय जय रघुवीर समर्थ !!!

आंघोळीच्या वेळी .......

गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती |
नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन साम्मिधीम कुरु ||

पापोहम पाप कर्माहम, पापात्माम पाप संभवाम |
त्राहीमाम कृपया गंगे, सर्वं पापं हराभव ||

जेवणा पूर्वी ....... 

वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे
सहज हवन होते नाम घेता पुकाचे
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म
उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म
जय जय रघुवीर समर्थ !!

सरस्वती वंदन....


या कुंदे नृत शा रहार धवला 

या श्वेत पद्मासना 
या ब्राह्मन्च्युत शंकर: प्रमोदिनी 
देवी सदा वंदिता
सामा पास्तु सरस्वती भगवती 

निशेष: जाड्या पहा ||

गुरुर ब्रह्म: गुरुर विष्णू
गुरुर देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रह्म

तस्मै श्री गुरुवेन्म: ||

संध्याकाळ .....दिवे लागणीच्या वेळी .....

शुभम करोति कल्याणम
आरोग्यं धन संपदा |
शत्रू बुद्धी विनाशाय
दीप: ज्योती नामास्तुते ||

दिव्या दिव्या दिपत्कार
कानी कुंडल मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशी
पाशी
माझा नमस्कार सर्व देवापाशी
घराची अडपिडा बाहेर जावो
बाहेरची लक्ष्मी घरात येवो.



कधीतरी लहानपणी हे सगळे श्लोक म्हणायची सवय होती....
पण जसा जसा माणूस मोठा होत गेला तशी तशी सवय मोड़त गेली....
असो पण जुन्य आठवणीना उजाळा मिळाला...

No comments: